लालपुलिया येथे कोळसा तस्करीचा भांडाफोड…. तीन ट्रक जप्त
वणी (19 .मार्च ):- येथील लाल पुलियावरील खाजगी कोळसा विक्री करणाऱ्या प्लॉटवर कोळसा खाली करताना तीन ट्रक सह आरोपींना ताब्यात घेऊन वणी येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या कारवाईने व्यापारांचे धाबे दणाणून ठेवलेले आहेत.
सविस्तर वृत्त गुरुवारी वणी पोलिसांनी माहिती मिळाली की,कोळसा खाणीतून काही ट्रक भरून नागपूर येथे जाण्याऐवजी लालपुलियावर एका खाजगी प्लॉटवर खाली करणार आहे अशी माहिती वरून वणी डी.बी पथकाने खाजगी प्लॉटवर जाऊन धाड टाकली त्यात तीन ट्रक थोडासा खाली करताना आढळून आले.
नागपूर येथील कंपनीच्या नावावर WCL निलजई कोळसा खाणीतून कमी दरात शेकडो टन कोळसा उचलून वरील व्यापाऱ्यांना विकत असल्याची गुप्त माहिती वणी येथील पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांना मिळाली.
त्यानुसार वणी पोलीस व डीबी पथकाने दुपारी बबलू दिवाण, इमरान शेख व सुनील काळे यांचा कोळसा प्लॉटवर धाड टाकली.जेव्हा पथकाने ऑर्डर बघितले असता त्यावर निलजई ते बुटीबोरी येथील फ्रीडम नावाच्या कंपनीत कोळसा जात असल्याचे नमूद होते. मात्र कोळसा इथे कसा आला ? असे विचारणा केली असता,त्याचवेळी हा प्रकार उघडकीस आला.लगेच तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
मात्र या कारवाईला थांबविण्यासाठी अनेक दिग्गज पोलिसाच्या मागे फिरकया मारत असल्याचे स्पष्ट दिसून येत होते.
सदरची कारवाई मा. दिलीप पाटील भुजबळ (पोलीस अधीक्षक यवतमाळ ),संजय पुज्जलवार (उपविभागीय पोलीस अधिकारी,वणी) , वैभव जाधव (पोलिस निरीक्षक वणी) यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथकाने केली.



