Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणीतील पोहना शाळेतील शिक्षिका ज्योति ढाले यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित 

वणी (18 मार्च ): महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषद मार्फत जिल्हा शिक्षक पुरस्कार वणी पंचायत समितीतील पोहना गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या ज्योतिताई पंडितराव ढाले मॅडम(सौ.साखरकर) यांना 18 मार्च 2021 ला जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

   या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जी.प. अध्यक्ष मा.कलिंदा ताई पवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून बांधकाम सभापती मा.राम देवसरकर,  शिक्षण सभापती मा.श्रीधर मोहोड, यवतमाळ पं. स.सभापती मा.कांता कांबळे, दिग्रस पं. स.सभापती मा.अनिता राठोड, घाटंजी पं. स.सभापती नीता जाधव,झरी पं. स.सभापती मा.राजू गोंद्रावार, जी.प.सदस्यां स्वाती येंडे, रेणू शिंदे,अशोक जाधव, शिक्षण तज्ञा चितम कदम, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण पार पडले. विद्यार्थी-शिक्षक-पालक यांचा सहसंबंध उत्कृष्टरित्या साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासासाठी कार्य करणाऱ्या ढाले मॅडम यांची नियुक्ती 26 डिसेंबर 1995 ला जी.प.शाळा येथे झाली. वणी,झरी,मारेगाव या तालुक्यातील खेडेगावात विद्यादानाचे कार्य त्या करत आल्या.आता त्या पोहना येथील जी.प.शाळेत कार्यरत आहेत.

  “विद्यार्थी घडेल तर देश घडेल।,याच सार्थ भावनेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासासाठी कार्य करत आली,आज या कार्याची पावती मिळाली याचा आनंद होत आहे,आता पुन्हा दुप्पट ऊर्जेने काम करण्याचे बळ या पुरस्काराने मिळाले.”--ज्योतिताई ढाले(साखरकर मॅडम)  या पुरस्काराचे श्रेय त्यांनी पदोपदी साथ देणारे त्यांचे पती श्री.राजेंद्र साखरकर सर यांना दिले. तसेच मुलगी व मुलगा तसेच मार्गदर्शक यांच्या पारिवारिक व शैक्षणिक सहकार्यातून हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे त्यांनी विशद केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!