अबब…. थेट पेपर वितरणावरती बहिष्कार
★कोरोणा चाचणी अनिवार्य केल्यामुळे वितरक नाराज
वणी( 14 .मार्च ) :- आज रविवार (14 मार्च) रोजी वाचक पेपर वाचण्यापासुन वंचित सविस्तर वृत्त असे की, शनिवार(13.मार्च) ला नगर पालिका प्रशासनाच्या वतीने संपुर्ण शहरात नोटीस धडकल्या की, शहरातील पानटपरी,फळ विक्रेते, वृत्तपत्र वितरक ,यांना कोरोना चाचणी अनिवार्य केली.
यामध्ये जर कोणी चाचणीला टाळाटाळ केली तर त्या वितरकाचा व्यवसाय बंद करण्यात येईल अशी एकटप्पी भुमिका पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली.
त्यामुळे संपुर्ण वृत्तपत्र वितरकांनी नगर परिषदेच्या एकटप्पी भुमिकेचा निषेध म्हणून वितरणावर निषेध दर्शविला आहे.
त्यामुळे आज वणीकरांना वृत्तपत्र वाचण्यापासुन वंचित रहावे लागणार आहे..



