Vidarbh24News

Latest Online Breaking News

काळे ले-आउट मध्ये आमदार निधीतून रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन

वणी (14 मार्च ):- शहरातील जैन ले आउट समोरील काळे ले आउट मध्ये समृद्धी अपार्टमेंट समोर आमदार विकास निधी अंतर्गत 25 लाखाच्या दोन रस्त्याचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, नगर सेवक धनराज भोंगळे व मंजुषा झाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

     आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या आधी काळे ले आउट मधील नाल्यांच्या बांधकामासाठी 15 लाख देऊन आधी सर्व नाल्यांचे बांधकाम पूर्ण करून घेतले. त्यानंतर या ले आउट मधील रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात दोन डांबरी रस्त्यासाठी आमदार निधीतून 25 लाख रुपये देण्यात आले. पुढील टप्प्यात या ले आउट मधील रस्त्यासाठी अधिक 40 लाख रुपये देणार असल्याचे घोषणा आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी शहरातील रस्ते विकास आमदार बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनात मागील चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. वणी नगर परिषद क्षेत्रात आमच्या कार्यकाळात सर्वाधिक रस्ते निर्माण झाले आहेत असे सांगितले. संजय पिंपळशेंडे यांनी समयोचित प्रतिक्रिया व्यक्त केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!