छत्रपती संभाजी महाराज स्मृतिदिना निमित्य अभिवादन
वणी( 11.मार्च ) : वणी येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती,महापराक्रमी, राजे संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विराणी हॉल रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे वणीतील नागरिकांनी स्वयंप्रेरणेने चौकात येऊन परिसर व फलक स्वच्छता करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राजेंद्रजी साखरकर ,महेश लिपटे ,अजिंक्य शेंडे,विकी जंगले,राकेश वाघमारे,सुदर्शन साखरकर,सौरभ वानखडे आदी वणीकर नागरिक उपस्थित होते.



