प्रेम नगर परिसरात धाड टाकून , दोन युवतींची सुटका
वणी( 10 मार्च ) :- नागपूर येथील फ्रिडम फॅम या संस्थेनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली की, वणी शहरातील प्रेमनगर भागात अल्पवयीन मुलींची मोठ्या प्रमाणात देह विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे वणी व मारेगाव पोलीसांनी संयुक्त कारवाई करून ,दोन मुलींची सुटका करुन, दोन महिलाना ताब्यात घेतल्या आहे.
सविस्तर वृत्त असे की, मारेगाव पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार सह पथक आणी फ्रिडम फ्रेम यांचे स्वयंसेवक वणी येथील प्रेमनगर परिसरात दाखल झाले .आणी संपुर्ण प्रकारची खात्रीशिर माहिती गोळा करुन , कुंटनखाण्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये चाळिशीतील दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. आणी यांच्या कडुन एक अल्पवयीन मुलगी व २८ वर्षीय मुलींची यांच्याकडुन सुटका करण्यात आली.
ह्या महीला मागील कित्येक महिन्यापासून, या मुलींनकडुन अवैद्य व्यवसाय करुन घेत होत्या, अशी माहिती सुत्राकडुन मिळाली आहे. ह्या महीलांकडुन ४०५०/- रु. मुद्देमाल जप्त करुन ,दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.
या महिलां विरूध्द भां.द.वी कलम ३६३,३६६,(अ) ३७०(४) (१) सहकलम ३,४ अनैतिक व्यवसाय करणे या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. समोरील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो.नि. मायाताई चाटसे व तपास करीत आहेत.



