जागतिक महिला दिनानिमित्त वणीतील लेखीका सौ.महेश्वरी लांडे यांच्या अप्रतिम असा लेख 

!! पाठ-परिचय !!
————————————
लेखिका :- महेश्वरी रमेश लांडे मु. पोस्ट.सास्ती, तालुका-राजुरा ,जिल्हा -चंद्रपूर/ सौ. महेश्वरी सुमित आवारी मु .चिखलगाव, ता- वणी ,जिल्हा- यवतमाळ शिक्षण..( एम. ए. इकॉनॉमिक्स आणि मराठी ) लग्न झालेले पती सुमित सुभाष आवारी मु. पोस्ट.चिखलगाव, ता.वणी, जि. यवतमाळ शिक्षण.. (बीए. बीएड,) व्यवसाय.. खाजगी शैक्षणिक संस्था मार्डी.नवव्या वर्गापासून लेखनाचा छंद असून ती अजूनही जोपासत आहे. यामध्ये तिला पतीची भरपूर साथ आहे. लग्नाआधी “मानसीचे रूप गंध” हे ललित निबंध प्रकाशित झाले आहेत. मी काही कविताही लिहिल्या आहेत.त्या पुस्तकात दिलेले आहे.
————————————————————– !! लेख :– स्ञी !!
असंख्य वेदनांनी आणि अनंत अपेक्षांच ओझं डोईवर घेऊन मी जन्माला आले.जिच्यामूळे जीवनात गोडवा आणि निराशा येते ती मीच स्त्री आहे.बरेच जण मला मूर्ख बावळट आगाऊ आणि बरचं काही समजतात.
मुलगी जन्माला आली…….
मी तर प्रत्येक नवऱ्याच्या मोबाईल मधे असलेला नवर्याला खुदकनं हसवनारा जोक्स् सुद्धा आहे.मला ना ! पुरूष वर्ग कमजोर समजतो. म्हणूनच तर माझ्यावर माझ वयही न बघता अत्याचार,बलात्कार,अँसीड हल्ला,हूंड्यासाठी माझा मानसीक,शारीरिक छळ काही वेळी तर जाळपोळ करून मारुन टाकतात.माझ्याशी अस वागून त्यांना काय मिळत त्यांच त्यांनाच माहिती पण मला त्रास होतो .भंयकर असह्य बहुधा माझ्या त्रासात अत्याचार करणाऱ्यांचा आंनद लपलेला असतो.
मी कमजोर आहे. हे तर त्यांनी गृहीतच धरलेल पण , स्वतःला शक्तीशाली समजणारा घटक माझ्या सारख्या कमजोर घटकावर का अत्याचार करत असेल ? याला जबाबदार कोण ? माणसिकता, संस्कार, शिक्षण, आचरण, विचार,सरकारी धोरणं कि, आणखी काही. पार गोंधळुन गेलेय मी डोक्याचा भुसा झालाय. बरेच जण तर मला जन्माला येण्याआधीच नाकारतात. कुठे – कुठे तर माझ्यावर बलात्कार होईल ,या भितीने मुलगी नको म्हणतात. मात्र बऱ्याच जणांची मी भाग्यलक्ष्मी सुध्दा असतें .आज माझा जन्म नाकारताय उद्या माझ अस्तित्व नाकाराल. नाही !!!! तुम्ही तस नाही करू शकत. माझ अस्तित्व नाकारणं म्हणजे पृथ्वी नाश करण होय.कारण पृथ्वी वंश वाढवण्याच काम स्ञी आणि पुरूष दोघे मिळून करतात.मूलगी ही जात कोणी नष्ट करू पाहत असेल तर, या ब्रम्हांडाच काय होईल !
आणि हे आपल्या भारतातच नाही , तर विकसनशील आणि विकसीत देशातही स्ञियांना दूय्यम स्थान आहे.सिमाँन द बोव्हार या फ्रेंच लेखिका आपल्या द सेंकड सेक्स या पूस्तकात लिहीतात की , स्ञी हि जन्माला येत नाही तर , ती घडवली जाते .तसाच पुरूषही जन्माला येत नाही तर तो घडवला जातो.मग आपण बलात्कारी किंवा अत्याचारी पुरूष नक्कीच नाही घडवतो आहो.मग ,ही क्रूर मानसिकता समाजात जन्माला का यावी ?आता तर विकृतीने कळस गाठलाय जन्मदाता पिताच पोटच्या पोरीवर बलात्कार करतोय.जिच्या वात्सल्याची तुलना जगात कशाशीच नाही ,अशी माता स्वत:च्या पोटच्या गोळ्याला काही पैशांसाठी विकते आहे.माणसाच्या या दूनियेत माणूस हरवून सैतान वास्तव्यास आला की काय ? काळीज तर पिळवटून तेव्हा निघत ,जेव्हा माझ्यावर मीच अत्याच्यार करते.मान्य प्रत्येक स्ञी ही दुसऱ्या स्ञीचा थोड्या प्रमाणात का होईना द्वेश करतेच .
पण नवऱ्याच्या शारीरिक कमजोरीमुळे मी आई होऊ शकले नाही ,तर सासूबाई स्वत:च्या मूलाला जबाबदार न धरता मला दोष देतात.मी तारूण्यात असतांना कोणाच्या प्रेमात पडले तेव्हाही दोष माझाच आई म्हणते,”तो मूलगा आहे त्याने काहाही केल तरी चालत तू मूलगी आहेस ग !” तूला समजायला हव कस वागायच.कधी चिड येऊन घरात मोठ्याने आवाज केला तर आजी सांगते, “मूलीच्या जातीला शोभत नाही इतक्या मोठ्या आवाजात
बोलायला”.एखाद्याच्या लग्नाला जिन्स घालून गेले तर मोठी ताई सूचवते मूलगी आहेस ग मूली सारखी तयारी करून जा लग्नाला !.खरचं कोण आहे मी फक्त मूलगी ?माणूस नाही, हो ना ….? माझी मी कोणीच नसेल ना ?का माझ्या जन्माचा आणि जगण्याचा अधिकार माझा मला नाही? आपल्या सारख्या सामान्य घरातील मूलींना वाटत की हायसोसायटीतील मूली किती फ्री असतात. त्यांचे कपडे,त्यांना सिगारेट किंवा प्याग मारतांना बघून आपण यांच्या सारख फ्री कधी होऊ $$$अस वाटत पण खरच त्या फ्री असतात का ?
कूठेतरी ! त्यांची घूटमळ त्यांना या वाईट मार्गाला घेऊन येत असेल आणि नसेलही होत .त्यांची घूटमळ त्या स्वत:च्या मर्जिने करत असेल. हे सगळ पण तिच्या घरचे तिच्या या वागण्याला मान्य करणारच नाही.हे खरं की कूठल्याच आई वडिलांना मूलानेही दारू,सिगारेट प्यायलेली आवडणार नाही. पण चूकुन त्याने प्यायली तर घरचे मान्य करतात कारण तो मूलगा आहे. त्याने प्यायली तर प्यायली पण तू मूलगी आहेस, तूझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.म्हणजे अपेक्षांच ओझ माझ्याच डोई.पण हे ही नाकारता येत की, मूलगा असो किंवा मूलगी जो तो स्वत:च्या मर्यादा विसरून वागेल. त्यांचा मान समाजात राहणार नाही.
मासिक पाळीत महिला मुलींना मोफत सँनिटरी साधन मिळावी, असा कायदा स्काँटलंडच्या संसदेनं नुकताच केला आहे आणि त्यासाठी ‘पीरिएड पाँव्हर्टी’ हा शब्द वापरला आहे.माञ मला पन्नास टक्के आरक्षण असलेल्या माझ्या देशात माझ्या मासिक पाळीविषयी बोलायला अजूनही संकोच वाटतो,तिटकारा वाटतो व विटाळ वाटतो.दुसऱ्याच तर सोडाच मला बाईपण मिळवून देणाऱ्या माझ्या पाळीविषयी बोलायला मलाच लाज वाटते.
हा समाज,रूढी,पंरपरा मला बांधू पाहते आहे पण ,माझ्या या परिस्थितीला कूठेतरी मी स्वत:च जबाबदार आहे.समाजाने मला सांगितल तू स्ञी आहे. तू लाजलीस पाहिजे,तू स्ञी आहे तू घाबरलस पाहिजे,तू स्ञी आहे तूला स्वंयपाक आलास पाहिजे. कुंटूबाने दिलं आणि मी प्रश्न ही न विचारता सहजपणे घेतल.कारण जागतिकीकरण झाल,आधूनिकीकरण झाल माञ स्ञिकरण झालेल नाही . ही शोकांतीका आहे डिजिटल यूगाची.
हे काहीही असल तरी माझ्यातील शक्तींचा मला विसर पडलेला नाही.मी शक्ती आहे कुंटूबाची मी जननी आहे. मला दया,माया,करूणा जन्मताच निसर्गाने अर्पण केली.मी इतकी मायाळू आहे की,तोंडाजवळ नेलेला घासही दुसऱ्याला देऊ करायला मागे-पुढे पाहत नाही. पण माझ्या आत्मसन्मानाला कोणी ठेचाळलं तर मी कोणाच्या तोंडी घासही लागू देणार नाही. इतक्या क्रूरपणे वागून जाते.मी प्रेम देऊ करते तेव्हा माझ्याजवळ बाकी काही उरणार की नाही. हा हिशोब न करता देऊ करते.स्वत:ला शून्य करून शून्यात नेणारी मी आदिशक्ती आहे,महाशक्ती आहे,नवशक्ती आहे,मी स्ञी शक्ती आहे,मी अजून ही स्ञीच आहे…….
————-—–//
-
—-/-/
——-
लेखिका~महेश्वरी लांडे( सुमित आवारी यांची पत्नी) वणी,चिखलगाव.