वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरिबांचे पाय वळू लागले जंगलाकडे………….
– पुन्हा जंगलाचे अस्तित्व आले धोक्यात
” हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा दैनंदिन गरजा पूर्ण होणार कसे ?”
वणी( 5 .मार्च ):- तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरिबांचे पाय जंगलाकडे वळतांना आता दिसून येत आहे.धुरमुक्त गाव करून वाढते प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अस्तित्वात आणले होते. परंतु गॅसचे भाव तड़कताच गोरगरिबांचे पाय जंगलाकडे वळू लागले असून जंगलाचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच आर्थिक बजेट कोलमडले आहे.मात्र शासनाने पेट्रोल ,डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीत ही प्रचंड वाढ केल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाक्याबाहेर होऊ लागले आहे.
मोलमजुरीचा भरवशावर संसाराचा गाडा हाकताना ” हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा दैनंदिन गरजा पूर्ण होणार कसे ?
” एका सिलेंडरची किंमत 867रु त्यापैकी फक्क्त 36.84 सब्सिडी देण्यात येत असल्याने पुढचा सिलेंडर घरात आणण्याचे स्वप्नही भंगले आहे. ! मोठ्या कष्टाने वाढलेल्या जंगलाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना दिसत आहे.गोरगरीब कोरोनाचा पार्श्वभूमीवर उदरनिर्वाह करणार कसा ?
गावातील जनतेतून नाराज़ीच्या सुर निघत असताना दिसत आहे.



