Vidarbh24News

Latest Online Breaking News

*महाबीजच्या नावावर ५० शेतक-यांची फसवणूक*

*महाबीजच्या नावावर ५० शेतक-यांची फसवणूक*
*बनावट पावत्या देवून २५ लाखांची लूट*
*गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल*
महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ अकोला मार्फत शेतकर्‍यांना मिळणार्‍या योजनेचा लाभ देण्याचे आमिष दाखवून महाबिजच्या नावावर बनावट पावत्या छापून त्याद्वारे कोरपना तालुक्यातील ५० शेतक-यांची सुमारे २५ लाखांनी लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. स्वत:ला कंपनीचा अधिकारी सांगून फसवणूक करणारा हा भामटा सध्या पसार झाला आहे. शेतक-यांनी गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोंभूर्णा निवासी लक्ष्मिकांत नानाजी मेश्राम याने महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ अकोला मार्फत शेतकर्‍यांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
महाबिजच्या नावाने बनावट पोच पावती व योजनेचे फॉर्म छपाई करून त्यावर प्रती शेतकर्‍यांकडून प्रत्येकी १२ ते १५ हजार अशी रक्कम वसुल केली,कोरपना तालुक्यातील ५० शेतकऱ्यांकडून सुमारे २५ लाखांनी लुबाडणूक केल्याचा धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ अकोला महाराष्ट्र शासन नावाच्या पावत्या देऊन पैसे घेतल्याने सदर इसमाशी संपर्क साधला परंतु त्याचा संपर्क होवू शकला नाही.
त्याचेकडून प्राप्त झालेल्या मोबाईल वरही संंपर्क केला परंतु त्याचा मोबाईल लागत नसल्याने, आपली फसगत झाल्याची स्थिती दिसून आली.
शेतकऱ्यांनी मूल येथील महाराष्ट्र बीज बियाणे महामंडळ कार्यालयात जाऊन चौकशी केली, सदर व्यक्ती या ठिकाणी कार्यरत नाही असे सांगण्यात आले, या माहितीने शेतक-यांना धक्काच बसला.
शेतक-यांनी सांगितलेल्या नावाचा व्यक्ती कंपनीकडे कार्यरत नाही, शिवाय आम्ही त्याला ओळखत नसल्याचे मूल येथील अधिका-यांनी सागितल्याने फसवत झाल्याचे लक्षात आले.
कोविड 19 संसर्ग, संकटामुळे शेतकर्‍यांची परिस्थिति हलाखीची असताना महाबिज कंपनीच्या नावाने पैसै लुबाडणूक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कोरपना तालुक्यातील ५० शेतकऱ्यांची फसवणूक करणार्‍या भामट्याचा शोध घेऊन, कायदेशीर कारवाई करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा.
शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत मागणी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!