श्री गजानन महाराजांचा 143 व्या प्रगट दिनानिमित्त वणीचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या हस्ते महाआरतीचा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतिने संपन्न

वणी( 5 .मार्च) :– संत गजानन महाराजांच्या 143 व्या प्रगट दिनानिमित्त वणी येथे महाआरतीचा कार्यक्रम अगदी साध्या व सोप्या पद्धतीने पार पाडण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाच्या श्रीच्या प्रगट दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा पूर्णपणे बदलविण्यात आली व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत वणी येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वैभव जाधव व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर यांच्या हस्ते श्री.गजानन महाराजांची महाआरती करण्यात आली.
महत्वाचे म्हणजे या दिवसाचे औचित्य साधून वणी येथील सर्वांचे लाडके व कर्तव्यदक्ष व्यक्ति म्हणून प्रसिद्ध असलेले वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रवी बेलुरकर ,दिलीप रेभे व रवी रेभे (उपाध्यक्ष,व्यापारी आघाडी भाजपा) व मित्रपरिवार यांच्या हस्ते भारतीय संस्कृतिनुसार शॉल, श्रीफ़ळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करुन भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सर्वस्वी कार्यक्रमाचे आयोजन रवि रेभे (उपाध्यक्ष व्यापारी आघाडी भाजपा) यांनी अत्यंत सुबद्धतेत शासनाच्या नियमाची पायमल्ली न होऊ देता ,काटेकोरपणे पालन करीत या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडले.तसेच तेथील उपस्थित मित्रपरिवार यांनी “गण गण गणात बोते’चे नामस्मरण करत श्री.गजानन महाराजांना प्रत्येकांनी स्मरण केले व महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा कहर पाहता कमी होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना सुद्धा केली.
या कार्यक्रमाला उपस्थिति म्हणून लव्हली लाल, नितिन बिहारी,निखील माकोडे, मनोज रेभे, पटेल पेग ,गजानन पुरमशेट्टीवार ,अजय पुरमशेट्टीवार आदि उपस्थित होते.