साहेब, आम्हाला घरकुल द्या हो
सावली शहरात मागील पाच वर्षापासून म्हणजे २०१५ पासून एकही घरकुलचे बांधकाम काम करण्यात आलेले नाही आहेत. सावली नगरपंचायतची निर्मिती २०१५ ला झाली. पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना लोकांना रमाई आवास योजना, शबरी योजना त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गावातील नागरिकांना मिळत होता.परंतु जेव्हापासून नगरपंचायतची निर्मिती झाली तेव्हापासून घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही आहे. त्याचबरोबर शहरातील महिलांना मोफतमध्ये शिलाई मशीन, कॉम्पुटरचे प्रशिक्षण मोफत मिळत नाही आहे त्यामुळे शहरातील महिलांना नगरपंचायत शाप कि वरदान? असा प्रश्न पडत आहे.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी निवासी सोय करून देण्यासाठी विविध योजना लागू करण्यात आल्या मात्र नगरपंचायतच्या दुर्लक्षामुळे इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांचे स्वप्न शेवटी स्वप्नच राहिले.
सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक जणगणनेनुसार गरीब कुटुंबीयांची प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती यादी मधून शहरी भागातील गरीब गरजू लाभार्थाची नावे वगळले असल्याची बाब उघड झाली. व या योजनेची अंबलबजावणी झाली नाही.
केंद्रातील मोदी सरकारने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याबाबतची योजना घोषित केली असतांना मात्र २०२१ पर्यंत इतरमागासवर्गीयासाठी एकही घरकुलचे टार्गेट पूर्ण झाले नसल्यामुळे २०२२ पर्यंत शासनाची ही योजना लाभार्थांची स्वप्न कसे पूर्ण करणार ? असा प्रश्न सर्वसामान्य लाभार्थी उपस्थित करतांना दिसत आहेत.
बाजूच्या सिंदेवाही, पोम्भूर्णा व नागभीड नगरपंचायतने ५०० च्या वर प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर केले असतांना मात्र सावली नगरपंचायतने का बरं केले नाही असा प्रश्न नागरिक करीत आहेत, गरीब व गरजू इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील नागरिक साहेब, आम्हाला आम्ह्च्या हक्काचे घरकुल बांधून द्या हो अशी मागणी नगरपंचायतकडे करीत आहेत.



