Vidarbh24News

Latest Online Breaking News

कवठी येथे शॉर्ट सर्किट मुळे घराला आग..

कवठी येथे शॉर्ट सर्किट मुळे घराला लागली आग…

आगीत लाखो रुपयांची जीवनावश्यक वस्तू जळून राख…

कवठी प्रतिनिधी :- (दि. 4 मार्च ) कवठी येथील श्री. सुरेश गणपत आभारे यांच्या राहत्या घराला दिनांक 3/ 03/2021 रोजी रात्री 7:30 ते 8:00 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने आगीत जीवनावश्यक वस्तूंचे / साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.                                                                                  गावातील घराजवळील लोकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. मात्र आग आटोक्यात येईपर्यन्त घरातील त्यांना लागणारे तांदूळ, गहू, मिरची, तुवर डाळ, लाखोरी डाळ, कपडे, इतर वस्तू, रोख रक्कम, मंगल सूत्र सोन्याचे मनी इत्यादी जीवनावश्यक वस्तू जळून राख झाल्या. जीवनावश्यक वस्तूंचे अंदाजे किंमत 15,750 (पंधरा हजार सातशे पन्नास रुपये), इतर वस्तूंचे 85,000 (पंच्यांशी हजार रुपये), तसेच रोख रक्कम 7000 (सात हजार रुपये), असे ऐकून 1,07,750(एक लाख सात हजार सातशे पन्नास) रुपयांचे नुकसान झालेले आहे. आभारे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने गावात या घटनेविषयी हळहळ व्यक्त केल्या जात आहे.                                      दि. 4 मार्च ला सकाळी 8 वाजता घटनास्थळी पंचनामा करताना तलाठी- कु. जयश्री केसुळ्कर मॅडम, कोतवाल- श्री. कोसरे, कवठी सरपंच सौ. कांताबाई बोरकुटे, उपसरपंच श्री. विलास बट्टे, पोलीस पाटील श्री. सचिन सिडाम, ग्रामपंचायत सदस्य श्री. राकेश घोटेकर, श्री. सुनील कुळमेथे, तं. मु. स. अध्यक्ष श्री. टिकाराम म्हशाखेत्री, श्री. पुनाजी भोयर, श्री. साईनाथ मेश्राम, श्री. चरणदास बट्टे उपस्थित होते.                    यावेळी कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी शासनाकडून आर्थिक सहाय्य्यता मिळवून देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांन समोर केलेली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!