सर्पमित्र हरिष कापसे यांनी दिले दुर्मिळ जातिच्या सरड्याला जिवदान
वणी( 24 फेब्रू ):- शहरातील प्रसिध्द असलेले सर्पमित्र हरिष कापसे यांना विद्यानगरी वसाहतीमधुन दूरध्वनी आला की ,वसाहतीमध्ये राहणारे अशोक चौधरी यांच्या घरात ए.सी असलेल्या खिडकी नजिक एक साप आहे. सर्पमित्र हरिष कापसे विद्यानगरी येथील अशोक चौधरी यांच्या घरी तात्काळ दाखल झाले आणि वातानुकुलीत यंत्राच्या आजुबाजुला पाहणी केली असता, त्यांना कुठल्याही प्रकारचा सर्प आढळून आला नाही.परंतु त्याच ठिकाणी दबा धरून बसलेला एक दुर्मिळ जातीचा सरडा तिथे आढळून आल्याने ,सर्पमित्र हरिष कापसे यांनी त्याला पकडून निलगरीवन येथील जंगलात सोडून दिले.