Vidarbh24News

Latest Online Breaking News

अध्यक्षाच्या अचानक भेटीने बँक कर्मचा-याची धावपळ

 

मारेगाव (24.फेब्रू ) :- यवतमाळ  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी  सकाळी सव्वा दहा वाजता अचानक मारेगाव शाखेला भेट दिली.या वेळेस काही कर्मचारी गैरहजर आढळून आले. लेट लतीफ कर्मचा-याना कामात सुधारणा न केल्यास कार्यवाही करण्याचा कडक इशारा दिला. कार्यालयीन वेळेच्या सुरवातीलाच  अध्यक्षाचे आगमन झाल्याने कर्मचा-यांची चांगलीच धावपळ झाली.

राजुर ग्रामपंचायत विजयी जल्लोष

बँक कामकाजाच्या वेळात आता बदल करण्यात आल्यामुळे बँकेचे व्यवहार सकाळी 10 वाजता सुरु होतात.मात्र काही कर्मचारी उशीराने येत असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्षाना मिळाल्याने त्यांनी ता.24फेब्रुवारीचे सकाळी सव्वादहालाच मारेगाव शाखेला भेट दिली.

सकाळीच अध्यक्ष बँकेत दाखल झाल्याने कर्मचा-यांची चांगलीच धावपळ झाली.यावेळेस काही कर्मचारी गैरहजर होते. उशिराने हे कर्मचारी बँकेत आल्यावर या लेट लतीफ कर्मचा-या अध्यक्षानी चांगलेच धारेवर धरीत कार्यवाहिचा दम देत कामात सुधारणा करण्याचा इशारा दिला. या वेळेस अध्यक्षानी कर्ज वाटप,कर्ज वसुली,ठेवी,ओव्हर ड्राप,लॉकर, रोख रक्कम,भौतिक सुविधा आदी कामाचा आढावा घेतला.त्या नंतर बँकेत उपस्थीत असलेल्या ग्राहकांशी हितगुज करीत बँकेच्या सेवे बद्दल आणि आणखी कोणत्या सुधारणा करायला पाहिजे या विषयी त्यांची मते जाणून घेतली.अध्यक्षांच्या अचानक भेटीने तालुक्यातील सर्वच जिल्हा बँक  शाखेचे लेट लतीफ कर्मचारी धास्तावलेले होते.तर काही कर्मचा-यानी या भेटीचे स्वागत केल्याचेही दिसून आले.या भेटीचा बँक कामावर सकारात्मक परिणाम दिसून आला. ग्राहकांनीही या अचानक भेटीने समाधान व्यक्त केले.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!