वणी तालुक्यातील सर्वात मोठ्या राजुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विद्या डेव्हिड पेरकावार विराजमान तर उपसरपंचपदी अश्विनी प्रकाश बलकी
-अखेर गावाने दिली परिवर्तन पॅनलला साथ,गावात उत्साहपूर्ण वातावरण.
-जातीय भेदभाव व तोड़ पाहुन कामे करणार नाही तर फक्त येणारे 5 वर्ष गावविकासच करणार – नवनिर्वाचित सरपंच विद्या डेविड पेरकावार.
वणी ( 24 फेब्रू ) :-तालुक्यातील सर्वात मोठा गाव म्हणजेच मिनी इंडिया म्हणून ओळख असलेल्या राजुर ग्रामपंचायतीत बिनविरोध सरपंचपदी निवड विद्या डेविड पेरकावार यांची तर उपसरपंचपदी अश्विनी प्रकाश बलकी यांची निवड झाली.निवडणुकीत परिवर्तन पैनलला बहुमतासाठी फक्त 9 सीटच गरजेचे होते. परंतु 17 पैकी परिवर्तन पॅनलला 11 या जागेवर विजय मिळाला होता. त्यामुळे फक्त सरपंच पदाची केवळ औपचारिकता बाकी होती.

गेल्या चार पंचवार्षिक पासून निवडणुकीत डेविड पेरकावार राजूर गावात भरघोस मतांनी निवडून आले गेल्या अनेक वर्षापासुन सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी एका हाकेवर धावून जाणारे डेविड पेरकावार यांनी यावर्षीही आपल्या पत्नीला रिंगणात उभे केले व ते भरघोस मतांनी निवडून आल्या.यंदाच्या चुरशीचा निवडणूक
राजूर गावात परिवर्तन पॅनलचे शिलेदार व कर्तुत्ववान नेते अशोक वानखेडे, डैनी संड्रावार, वसुंधरा गजभिये ,बाळा हिकरे ,प्रविण खानझोडे व शंकर बोरगलवार अश्या कर्तुत्वान नेत्यांच्या नेतृत्वात पार पाडली .
यांचे आधीचे कार्य पाहूनच गावातील जनतेने त्यांच्या परिवर्तन पॅनलवर खूप मोठा विश्वास दाखविला. गावातील जनतेने निवडणुकीत जनता पॅनलच्या पदरात फक्त सहा उमेदवार निवडून दिले. महत्त्वाचे म्हणजे ते सत्तेवर असताना देखील त्यांना सत्तेपासून जनतेनेच दूर केले .यंदा जनता पॅनलच्या हातात जनतेने कोणताही कौल दिला नाही.सरतेशेवटी परिवर्तन पैनलला भरघोस मते देऊन त्यांच्या हाती एकतर्फी सत्ता दिली.गावांनी सर्वात जास्त परिवर्तन पैनल पसंती देत महाविकास आघाडीच्या गटाला विजय केले.राजुर गावातील आरक्षण अनुसूचित जमाती महिलासाठी निघाल्यामुळे गावातील राजकारणात उत्कृष्ट व्यक्तीची पत्नी विद्या डेविड पेरकावार यांची बिनविरोध सरपंचपदी निवड तर उपसरपंचपदी अश्विनी प्रकाश बलकी यांची निवड झाली..1) विद्या दाविद पेरकावार-सरपंच 2)अश्विनी प्रकाश बलकी-उपसरपंच 3) दिपाली अनिल सातपुते-सदस्य 4) वंदना विजय देवतळे-सदस्य 5) विवेक मनोहर निमसटकर-सदस्य 6)मंजुषा अरविंद सिडाम-सदस्य 7) चेतना यशवंत पाटील-सदस्य 8) सुचिता सावन पाटील-सदस्य 9) पायल अनिल डवरे-सदस्य 10) विजय छोटेलाल प्रजापती-सदस्य
विदर्भ 24न्यूज वणीला नवनिर्वाचित सरपंच यांनी दिलेली माहिती ,“आधी गावातील समस्त जनतेला कोटी कोटी धन्यवाद देऊन इच्छितो.गावकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करणार विद्या डेविड पेरकावार यांनी सांगितले त्यांनी असेही म्हटले की,” मागील पाच वर्षांत गावाचा पाहिजे तसा विकास झाला नाही.माझ्या परिवर्तन पॅनलवर विश्वास दाखवला व बहुमताने निवडून दिले.रस्ते ,पाणी ,सांस्कृतिक ,धार्मिक व सामाजिक इत्यादी क्षेत्रात येणाऱ्या पाच वर्षात विकास करायचा आहे.सदैव जनतेसाठी तत्पर राहणार व विकास कामे करताना तोंड पाहून न करता फक्त आणि फक्त विकासाकडे येणारे पाच वर्ष लढणार आणि कामे करणार त्यासाठी विरोध वाढला तरी चालेल .”असे परखड शब्दात सांगितले आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार…..असे नवनिर्वाचित विद्या पेरकावार यांनी आज विदर्भ24न्यूज़ वणीला दिली माहिती .” 



