कायर गावात अत्यंत साध्या पद्धतीने गावातील युवकाने एकत्र येऊन केली शिवजयंती साजरी
कायर ( 19. फेब्रू ) : वणी तालुक्यातील कायर गावात अत्यंत साध्या पद्धतीने गावातील काही युवकाने एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली .आज दि.१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकाळी गावातील युवाकांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उपस्थितीत युवकांतर्फे पुजन व हारार्पण करण्यात आले.


यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी शिवप्रेमी बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती.

कोरोनाचा वाढता प्रभाव व जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे नियमांचे काटेकोरपणे पालन करत सायंकाळची जंगी मिरवणूक रद्द करून गावकरी व युवक एकत्र येऊन महाराजाची जयंती गाजा वाजा न करता शासननाने दिलेल्या सूचनेनुसार मास्क घालून अत्यंत साध्या पद्धतीने साजरी केली.
यावेळी उपस्थित म्हणून नागेश धनकसार , कुनंद टोगे ,कपील शंकावार,नंदु अंबोरे,अतुल वाघाडे व असंख्य गावकरी उपस्थित होते.



