माजी .मुख्यमंत्री कन्नमवार यांचे बोर्डा दिक्षित येथे झालेल्या विटंबनेला २१ दिवस लोटूनही प्रशासनाला जाग का आली नाही ?
– नगरसेवक, राकेश बुग्गेवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनामार्फत मागणी.
वणी ( 17. फेब्रू ) :- स्वातंत्र्य सेनानी, माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब उपाख्य मारोतराव कन्नमवार यांचे बोर्डा दिक्षित ता.पोंभूर्णा जि.चंद्रपूर येथील सभागृहाला दिलेले नाव प्रजासत्ताक दिनी प्रशासकीय अधिकारी ठाणेदार पोंभूर्णा यांच्या समक्ष मिटवल्यात आला. ग्रामपंचायत सदस्यांवर दबाव आणून ग्रामपंचायत अधिनियमाच्या उल्लंघन करून वेळेवर सभा घेण्यास भाग पाडला.


स्व. मा. सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृह दिलेले नाव मिटवण्यास सहकार्य करणाऱ्या पोंभूर्णा ठाणेदार यांच्यावर घटनेला २१ दिवस लोटूनही माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या विटंबनेचा प्रशासन काहीच कारवाही करत नाही.
पुनश्च स्व. मा. सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृह हे नाव लिहिण्यास प्रशासन विलंब का करत आहे .पुनश्च स्व. मा. सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृह हे नाव लिहिण्यास प्रशासन विलंब का करत आहे याच्या निषेधार्थ आणि कारवाईला उशीर का ?
प्रशासन उदासीन का ? याबाबत मुख्यमंत्री आणि संबंधीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना राकेश बुग्गेवार, नगरसेवक, यांनी पत्रद्धारे मागणी केली आहे.




