छ.शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचा औचित्याने नेत्र तपासणी व गरजूंना मोफत चष्मे वाटप शिबीर संपन्न
वणी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने १६ फेब्रुवारीला२०२१ रोजी नगर परिषद शाळा क्रमांक ८ जवळ सकाळी दहा वाजता महात्मे नेत्र पेढी नागपूर, शिव जन्मोत्सव समिती वणी व नगर सेवा स्वच्छता समिती वणी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या शिबिरात स्व.प्रल्हाद पंत रेभे गोवा मुक्ती स्वातंत्र्य संग्राम सैनिक व स्व. विलासराव रेगुंडवार यांचे स्मृती प्रित्यर्थ शहरातील २०६ गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले, या शिबिरात ४४५ रुग्णांनी सहभाग घेतला होता.
२१ फेब्रुवारीला २० रुग्णांची शस्त्रक्रिया करिता नागपूर महात्मे नेत्र पेढी येथे नेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय देरकर, मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष, डॉ डोंगरावार महात्मे नेत्र पेढी नागपूर, वैभव जाधव ठाणेदार वणी, राजू तुराणकर ,नामदेवराव शेलवडे, दिनकर ढवस, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, रवी रेभे,राकेश रेगुंडवार,यांचे उपस्तीतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वी होण्यासाठी संजय बावणे, ललित लांजेवार, मिलिंद बावणे, सागर जाधव, चेतन डोर्लीकर,अजय कुमरे,सचिन मोहूर्ले,नितीन मोहूर्ले,हर्षद मुसळे,सौरभ वानखेडे, आरिफ पठाण, मंगल भोंगळे,जनार्थन थेटे,सौरभ वानखेडे आनंद बोरकर, यांनी परिश्रम घेतले.




