Vidarbh24News

Latest Online Breaking News

संत रविदास महाराज यांची ६४४ वी जयंती चर्मकार युवा मंच वणीच्या वतिने साजरी

वणी (16 फेब्रू ): समतेचे अग्रदूत संत रविदास महाराज यांची ६४४ वी जयंती श्री. संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी द्वारा संत रविदास महाराज सभागृह येथे अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.“करम बंधन में बंध रहियो,फल की ना तज्जीयो आस।करम मानुष का धर्म है,सत् भाखै रविदास।” असे परिवर्तनवादी,समतावादी विचार मांडणारे महान संत रविदास महाराज यांची जयंती वणी उपविभागीय क्षेत्रातील  चर्मकार बांधवांतर्फे गेले ४-५ दशके दरवर्षी नित्यनेमाने मोठ्या उत्साहात साजरी केली जाते,यावर्षी सुद्धा त्याच जोमाने जयंतीचा १ दिवसीय ३ टप्प्यात कार्यक्रम पार पडला.

  

या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ६ वाजता नगर सेवा समिती,वणी व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील  संत रविदास सभागृह  परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

नंतर सकाळी ९ वाजता वणी शहरातील संत रविदास नगर येथील प्रतिमेस अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

लगेच सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे मुख्य स्थळ संत रविदास सभागृहात भव्य कार्यक्रमात दीपप्रज्वलन व प्रतिमेस माल्यार्पण जेष्ठ समाजबांधव मा.नामदेवराव धुळे,मा.बाबाराव पिंपळकर,मा.संबा वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच जयंती निमित्य समाजबांधवांनी प्रतिमेस अभिवादन करून मार्गदर्शनपर विचार प्रकट केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सोनी कुरील,प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रवींद्र धुळे यांनी केले.या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा,तालुका पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी चे पदाधिकारी,सदस्य तसेच संत रविदास जयंती उत्सव आयोजन समिती व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!