पंचायत राज समितीचा दौरा संशयाच्या भोवऱ्यात: तक्रारदार संभ्रमात
पंचायत राज समितीचा दौरा संशयाच्या भोवऱ्यात: तक्रारदार संभ्रमात
सिंदेवाही: तब्बल १४ वर्षानंतर जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील काही पंचायत समितीला पंचायत राज समितीने भेट दिली.मोठ्या आतुरतेने सिंदेवाही तालुक्यातील नागरिक हे आपल्या समस्यांकडे भिरकावून बघतील म्हणून प्रतीक्षा करत होते. अर्थातच स्थानिक अधिकारी हे सर्व सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करत असल्याने हि त्यांची भेट अतिशय महत्त्वाची होती.तसेच पंचायत राज समितीचा दौरा पंचायत समितीला होणार म्हणून तालुक्यातील नागरिकांनी आपल गाऱ्हाणं तक्रारीच्या स्वरूपात इ मेल द्वारे पंचायत राज समिती च्या प्रमुखांकडे पाठवले.आपल्या वर होत असलेल्या अन्यायाबाबत कोणीच दखल घेत नाही याची शाश्वती नागरिकांना होत होती. ग्रामीण भागातील सामान्य माणूस हा आपल्या वर होत असलेल्या अन्याय निमूटपणे सहन करीत आहे. वरिष्ठ कर्मचारी वर्गसुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे.आज पर्यंत आपल्या तक्रारीकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचारी वर्गाचा अन्यायाची गाथा पंचायत राज समिती कडे तक्रार कडून न्यायाची अपेक्षा केली होती.मात्र ही न्याय मिळण्याची आशा धुळीस मिळणार की काय अशी नाराजगी सामान्य माणसात आहे.आज पंचायत राज समितीच्या कार्यप्रणालीवर तक्रारदार संभ्रमात आहेत. आज सिंदेवाही येथे पंचायत राज समिती चा दौरा सिंदेवाही मधील मोहाळी, कळमगाव गन्ना पेटगाव या गावा पुरताच दाखल झाला.पण मुख्य समस्येच्या विळख्यात असणाऱ्या ग्राम पंचायतकडे त्यांचे पाऊल पडले नाही.तक्रारदारांची आशा पंचायत राज समिती आपण केलेल्या तक्रारीवर काय कारवाई होणार याचीच वाट बघत होते.पण ही समिती पंचायत समिती सिंदेवाही ला भेट देऊन समोरच्या तालुक्यात निघून गेली.त्यामुळे समितीचा दौरा हा कशासाठी होता ह्याचं मुख्य कारण अजूनही कळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिक हे संभ्रमात अद्यापही कायम आहेत.