Vidarbh24News

Latest Online Breaking News

“फ्री मेथॉडिस्ट चर्च राजूर”येथे ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा

●प्रात:कालची प्रार्थना समाधीस्थळातील प्रांगणात मागील 85 वर्षापासून ही प्रथा सुरू

●संपूर्ण विदर्भात केवळ राजूर या गावातच होते, हे विशेष उल्लेखनीय!

वणी 17.एप्रिल :- तालुक्यातील सर्वात मोठ्या गावात फ्री मेथॉडिस्ट राजूर चर्चचा समाजबांधवांतर्फे ख्रिस्त बांधवांनी रविवार दिनांक 17 एप्रिल 2022 ला “ईस्टर संडे ” अवघ्या दोन वर्षांनंतर अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली.रविवार, 17 एप्रिल रोजी ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस हजारो खिश्चन समाजबांधवांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. गावात  लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थनासभांचे आयोजन राजूर समाधीस्थळातील प्रांगणात तसेच चर्च मध्ये करण्यात आले होते. दरम्यान, दरवर्षी पाल्म संडे,गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे निमित्त काढण्यात येते. दिंडी आणि शांतीयात्रा अतिशय उत्साहात करण्यात आली. मागील रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या यरुशलेम प्रवेशानिमित्त जगभरात पाल्म संडे अर्थात झावळ्यांचा रविवार साजरा करण्यात आला.तसेच उत्तम शुक्रवारी येशू ख्रिस्ताला मानव जातीचा उद्धारासाठी वध स्थमबावर खिळन्यात या त्यानंतर अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी प्रभू येशूने क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात 15 एप्रिलला गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा करण्यात आला आणि रविवार दि 17 एप्रिल रोजी येशूच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा झाला.

फ्री मथोडीस्ट चर्च राजूर  कॉलनी येथील पास्टर गिरीष शिरमनवार यांनी ईस्टर निमित्त बायबलमधील वचनांच्या आधारे संदेश दिला. यावेळी चर्चच्या सदस्यांनी प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाबाबत गीते सादर केली. यावेळी फ्री मथोडीस्ट प्रांगणात भोजनविधीही समस्त बांधवतर्फे आयोजित करण्यात आला होता.

“देशात चालत असलेल्या घडामोडीसाठी प्रातःकालीन प्रार्थना रविवारी पहाटे सहा वाजता प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त समाधीस्थळातील प्रांगणात राजूरचा  फ्री मथोडीस्ट चर्चचे समस्त सदस्य उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी झाले. अशाप्रकारची प्रात:कालची प्रार्थना संपूर्ण विदर्भात केवळ राजूर या गावातच होते, हे उल्लेखनीय! यावेळी पुनरुत्थान झालेल्या येशुकडे जगाला कोरोनाच्या संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या राजूर गावातील चर्च मध्ये ईस्टर संडे निमित्त आनंदाचे वातावरण पसरले होते. “

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पास्टर तथा कमिटीचे अध्यक्ष गिरीष शिरमनवार,सचिव डेव्हिड पेरकावार, खजिनदार प्रकाश तालावार,अब्राहम कलवलवार,श्याम संगमवार,मोजेस कोमलवार,विनोद तान्द्रा,शोलोमन येलपुलवार,बाबू कुक्कललवार,पत्रस पारखी, शमुवेल येलपुलवार समस्त कमिटी सदस्य व समाजबांधव उपस्थित होते.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!