देशभक्ती गीताने भारत माता पूजन कार्यक्रम संपन्न…
वणी :- येथील संस्कार भारती समिती च्या वतीने भारत माता पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने देश भक्ती गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्यध्यापक माधवराव सरपटवार , प्रमुख पाहुणे नाट्य लेखक व अभिनेता प्रकाश खोब्रागडे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व समितीला सहकार्य सदैव राहील असे सांगितले.

संस्कार भारती समितीच्या माजी अध्यक्षा रजनी पोयाम यांना कवी म्हणून तसेच 3 पुस्तक प्रकाशन व 27 विविध पुरस्कार प्राप्त झाले असून नुकताच उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच नगरसेविका संध्या अवताडे यांची जिल्हा पदी नियुक्ती झाली याकरिता समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शीतल मालखेडे यांनी मारेगाव येथे संस्कार भारती समिती सुरू करण्याचा विचार व्यक्त केला तसेच समितीचे कार्य व हेतू खूपच उत्तम असून नवीन कलावंतांना योग्य व्यासपीठ असून मी स्वतः प्रथमच व्यासपीठावर उभी झाली त्यामुळे आत्मविश्वास वाढला असे मनोगत व्यक्त केले.


यवतमाळ अर्बन को ऑफ बँक वणी व जैताई देवस्थान च्या वतीने देश भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. राकेश वाहदूळे, त्रेम्बक जाधव, मृदुला कुचनकर, वेदिका पांडे, शीतल मालखेडे यांनी देशभक्तीपर गायन केले तर 3 वर्षाची चिमुकली सुरांची उत्कृष्ट ज्ञान असणारी राधा कुचनकर हिने बहारदार देश भक्ती गीत सादर करून रसिकांचे म्हणे जिंकली.तबला सारंग लांबट, अमोल बावणे यांनी साथ दिली

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कासार सागर मुने यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण सातपुते तर आभार अर्पित मोहूर्ले यांनी केले. पुष्पगुच्छ सुनंदा गुहे, रांगोळी नंदा ठाकरे, पौर्णिमा पांडे, उत्कृष्ट ध्वनी कार्य संदीप आस्वले यांनी केले. कार्यक्रमाला अभिलाष राजूरकर, आकाश महादूले, बाबाराव मडावी, प्रणय मुने, समीक्षा काटकर तसेच समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



