कायर मार्गावर ग्रामसेवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला

– घात की अपघात ?
वणी :- वरोरा येथील ग्रामसेवकाचा वणी-कायर मार्गावरील वनकर यांचे शेताजवळील पुलाच्या खाली जमा असलेल्या पाण्यात संशयास्पद मृत्यूदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुहास बापुजी झाडे (४९)रा.शिवाजी वार्ड लांबट सर हाऊस जवळ वरोरा, असे नाव मृतदेहाजवळ आढळलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट झाले आहे.
सुहास झाडे हे ग्रामसेवक असुन आपटी दांडगाव ग्रामपंचायतीचे कामकाज सांभाळत असलेल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच ठाणेदार वैभव जाधव,सपोनि/ मायाताई चाटसे , पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामसेवकाच्या मृत्युचे खरे कारण पोलिस तपासात निष्पन्न होणार आहे.