Vidarbh24News

Latest Online Breaking News

धावत्या टिप्परला आग- करणवाडीतील घटना

 

मात्र जिवितहानी टळली.

यवतमाळ :-  नवरगांव व करणवाडी रस्त्याच्या मधोमध धावत्या टिप्परला अचानक आग लागून खाक होत असल्याची घटना सोमवार दि.१ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजताचे दरम्यान घडली.सुदैवाने या घटनेत मात्र जिवितहानी टळली.

 

करणवाडी व नवरगांव रस्त्यावरून जाणाऱ्या टिप्परला अचानक आग लागली. टिप्पर क्र MH 34-AR-9400 चालकाने आपले नियंत्रण घेऊन बाहेर निघण्याचा प्रयत्न केला व बाहेर पडले.काही कळण्यापुर्वीच आगीने रुद्र रूप धारण केले होते, बाजूने टिप्परला भयंकर आग लागल्याने टिप्पर खाक होण्याच्या स्थितीत होता.दरम्यान,आगीच्या प्रवाहाने ज्वालाने दुतर्फा वाहतूक विस्कळीत होती.तुर्तास आगीचे कारण स्पष्ट नसुन वाहन चालका बाबत माहिती प्राप्त होवू शकली नाही.वरोरा येथील रेती वाहन असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.

 

परिसरातील नागरिकानी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून तपास करीत आहेत.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!