राष्ट्रीय ओबीसी महासंघ व महिला प्रबोधन मंच राजुरा तर्फे सावित्रीबाई फूले जयंती निमित्त महिला शिक्षण दिन तथा बालिका दिन संपन्न
विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार 8855994001
*राष्ट्रीय ओबीसी महासंघ व महिला प्रबोधन मंच राजुरा तर्फे सावित्रीबाई फूले जयंती निमित्त महिला शिक्षण दिन तथा बालिका दिन संपन्न*
दि.३ जानेवारी २०२१ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व महिला प्रबोधन मंच राजुरा तर्फे सावित्रीबाई फूले जयंती दिनाचे औचित्य साधून महिला शिक्षण दिन तथा बालिका दिन स्थानिक साने गुरुजी सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.इंदिरा पहानपटे होत्या.प्रमुख मार्गदर्शक डॉ.अभिलाषा गावतुरे प्रमुख अतिथी म्हणून योगीता पुणेकर मॅडम कु.प्रतीक्षा वाकुडकर,कु.श्रुती मोहीतकर,सौ.संजीवनी धांडे मॅडम होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.वैशाली भोयर,प्रास्ताविक सौ.रंजीता चापले,सावित्री स्तवन करुना गावंडे मॅडम यांनी सुरेल स्वरात सादर केले तर आभार सौ.वैशाली पावडे यांनी मानले.डॉ.गावतुरे मॅडम यांनी महिला सक्षमीकरण काळाची गरज असुन महिलांच्या सबलीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले व सावित्रीबाईचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून परिवर्तनासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे असे प्रतीपादन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.निता कोंडेकर,रिता देरकर व ज्योती गुरुनुले यांनी अथक परिश्रम घेतले.



