पंचशिल बुध्द विहार रामनगर गडचिरोली येथे भीमा कोरेगाव शोर्य दीन साजरा
पंचशिल बुध्द विहार रामनगर गडचिरोली येथे भीमा कोरेगाव शोर्य दीन साजरा
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली: १ जाने.२०२१रोजी पंचशिल बुध्द विहार रामनगर गडचिरोली येथे विजयी स्तंभला सलामी देऊन विजयी स्तंभाला अभिवादन करून, ध्वजारोहण आयु. मूनिश्र्वर बोरकर सर यांचे हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे सचिव महेंद्र गेडाम,मा. अध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन, शालिक खोब्रागडे से.नी. तहसीलदार , धराबाई मेश्राम अध्यक्ष त्रिषरण महिला मंडळ तर सचिव सुप्रिया मेश्राम हे होते. शिलाबई शेंडे यांचे नेतृत्वात सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली.विजयी स्तंभ व शोर्या दिनाविषयी धराबई मेश्राम, सिद्धार्थ गोवर्धन व मुनिष्वर बोरकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गौतम डांगे सर, तर आभार दर्शना विकास मेश्राम यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताराबाई खोब्रागडे, पुनम भोयर, वनिता बांबॉले, दयाळ शेंडे, भैसरे आदींनी सहकार्य केले.



