नवीन वर्षात विविध भारतीय भाषेत विनामूल्य सहजयोग-ध्यान प्रशिक्षण
वणी (1 डिसें ) – कोविंड 19 ने संपूर्ण जगाला एका व्यासपीठावर आणून उभे केले आणि त्याचे नेतृत्व भारत देश करीत आहे. ही गोष्ट अध्यात्मिक क्षेत्रातही सिद्ध झाली आहे. श्री माताजी निर्मला देवी सहजयोग ट्रस्ट द्वारे सहजयोग ट्रस्ट , नवी दिल्ली व सहजयोग प्रतिष्ठान, पुणे द्वारे सहजयोग सुवर्ण जयंती उत्सव निमित्त संपूर्ण देशभरामध्ये 16 विविध भारतीय भाषांमध्ये सलग 12 तास ऑनलाईन कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्कारा च्या अनुभूतीचा निशुल्क प्रशिक्षण 3 जानेवारी 2021, रविवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे.
ऑनलाईन नियमित ध्यान साधने मध्ये जगातील 4 लाखा पेक्षा जास्त साधकांनी प्रतिदिवस आपली उपस्थिती दर्शवली. ज्यामध्ये वेगवेगळ्या वयो गटातील विविध जाती – धर्मातील व विविध देशातील साधकांनी सहजयोग ध्यान साधनेत सहभाग घेतला.

“सर्व धर्माचे सार – आत्मसाक्षात्कार” हा भारतीय अध्यात्मिक वारसा श्री माताजी निर्मलादेवी यांनी अविरत पणे ५० वर्षात सर्व देशामध्ये पोचविला .
ज्या आधारे ग्लोबल रेकॉर्डस ऍण्ड रिसर्च फाऊंडेशन (GRRF) द्वारा सहजयोग संस्था आशिया खंडातील सर्वात जास्त सामूहिकतेत ध्यान करून घेणारी संस्था आणि ऑनलाईन मेडिटेशन घेणारी सर्वात मोठी संस्था या नावाने पुरस्कार देण्यात आले.
दि. 3 जानेवारीला होणारे प्रत्येक सत्र हे 45 मिनिटाचे असून सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सलग 16 भाषांमध्ये ध्यान शिकवले जाणार आहे. प्रथम सत्र देववाणी संस्कृत भाषेमध्ये असेल ,त्यानंतर हिंदी, बंगाली , तेलगू,तामिळ, गुजराती,कन्नड , मल्याळम , पंजाबी, भोजपुरी, आसामी , मराठी, ओडिया , मैथिली, इंग्रजी आणि सिंधी असे एकूण 16 भाषांमध्ये संपूर्ण भारत देशातील साधक www.sahajayoga.org.in या वेबसाईटवर वर आणि learningsahajayoga या युट्युब चॅनेल वर सहजयोगध्यान साधनेचा अनुभव घेऊ शकतील. या कार्यक्रमाची माहिती संपूर्णतः निशुल्क टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800 2700 800 यावर उपलब्ध आहे अशी माहिती सहजयोग महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील धायडे यांनी दिली आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण झालेली असताना या परिस्थितीत सहजयोग ध्यान निशुल्क ऑनलाइन कार्यक्रम शहरात आणि संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांसाठीसाठी फायदेशीर होत असल्याचे निष्पन्न होत आहे. यासाठी सहजयोग जिल्हा समन्वयक रवी कुंटावार यांनी दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या ऑनलाइन ध्यान साधनेच्या कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराची अनुभूती या कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या मध्ये हिंदीत सकाळी 9.45 ते 10.30 वा. व मराठीत सायंकाळी 5.15 ते 6.00 वा. या वेळेत असल्याची माहिती दिली.



