जय बारी । जय ओबीसी । जय संविधान। घोषणाच्या जल्लोषात “ओबीसी विशाल मोर्चाला” बारी समाज वणीचा जाहीर पाठिंबा.
वणी :- दि. 30 डिसेंबर 2020 रोजी बारी समाज ओबीसी बांधवांची सभा , बारी समाज अध्यक्ष गणेश धानोरकर यांच्या घरी दुपारी 3:00 वाजता संपन्न झाली.केंद्रसरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना स्वतंत्र काँलममध्ये करण्यासाठी , वणी तहसील कार्यालयावर 3 जानेवारी 2021 रोजी ओबीसी विशाल मोर्चाच्या आयोजन व नियोजन संदर्भात ही बैठक घेण्यात आली.बैठकीत ओबीसी विशाल मोर्चा व ओबीसींची जातनिहाय जनगणना स्वतंत्र काँलम मध्ये करण्यात यावी या मुख्य मागणीला अनुसरून कृती समितीचे सह समन्वयक व बारी समाज वणीचे अध्यक्ष गणेश धानोरकर यांनी प्राताविक करतांना आपले मत व्यक्त केले.
बैठकी दरम्यान स्वतंत्र काँलम मध्ये ओबीसी जातनिहाय जनगणनाची आवश्यकता विशद करुन होणाऱ्या फायद्यावर मार्गदर्शन करण्याचे कार्य , OBC( VJ/DNT/NT/SBC) जातनिहाय कृती समिती वणी चे सहसचिव राम नारायणराव मुडे यांनी केले.
तसेच समाज बांधवांच्या ओबीसी हिताच्या बाबींवर सखोल मार्गदर्शन करुन संपूर्ण बारी समाज बांधवांनी पूर्ण ताकदीने मोर्चात सामिल होऊन वणी येथे होणाऱ्या ओबीसी विशाल मोर्च्याच्या ऐतिहासिक पर्वात सिंहाचा वाटा घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली.
तसेच प्रत्येक बारी समाज ओबीसी बांधवानी आता आपल्या पातळीवर ओबीसी हिताचे रक्षणासाठी लढा उभारण्यात भूमिका व सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
बैठकीत पुढे , बारी समाज हितचिंतक नंदकिशोरजी जवळे यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना तन,मन धनाने ओबीसी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कृती समितीच्या आवहानाला प्रतिसाद देत, बारी समाज अध्यक्ष गणेश धानोरकर, नंदकिशोरजी जवळे, निलेश होले ( नगरसेवक , वणी) , अमोल धानोरकर, दिपक खडसे, ललित धानोरकर, प्रियांशु धानोरकर, तसेच बारी महिलातर्फे अश्विनी धानोरकर ( अध्यक्ष- बारी महिला बचत गट) , अंजली होले, सरलाताई खडसे,रेखा धानोरकर, रेखाताई चौधरी, जया तुंबडे, सविता धानोरकर, छाया तुमडे , ज्योती धानोरकर इत्यादी बारी समाज ओबीसी बांधवांनी पुर्ण शक्तीने ओबीसी मोर्चात सामिल होण्याचे जाहीर केले.
जय बारी । जय ओबीसी । जय संविधान ।



