विवेकानंद विद्यालय कायर येथील कनिष्ठ लिपिक अशोक लोनगाडगे यांना निरोप..
वणी (11. डिसें) :- तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी अशोक लोनगाडगे कनिष्ठ लिपिक या पदावरून वयानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना निरोप देण्यात आला.
लोनगाडगे यांनी या संस्थेला 38 वर्षे सेवा दिली. 30 नोव्हेंबरला ते सेवानिवृत्त झाले.तेव्हा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मडावी होत्या .
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष रामाजी गोंडलावार होते. कार्यक्रमाचे संचालन इखारे यांनी केले ,तर आभार प्रदर्शन सोनाली भोयर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांदसवार, भोसले व घोडमारे यांनी परिश्रम घेतले.




