Vidarbh24News

Latest Online Breaking News

मुंबई आझाद मैदानावर १४ डिसेंबर २०२० रोजी वीज कंत्राटी कामगारांचे तीव्र आंदोलन

-कोरोना काळात शहीद झालेल्या २६ कामगारांना आर्थिक मदत करा.

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ चंद्रपूर: महावितरण कंपनीत सहाय्यक यंत्र चालक च्या २००० पदांची भरती बरीच वादग्रस्त ठरली असून या बाबत मा.औरंगाबाद उच्च न्यायालयात २ते ३केस चालू आहेत, याचा निकाल लागून पूर्ण चौकशी होई पर्यंत भरती स्थगित करावी, सध्या SEBC मूळे ही भरती तूर्त थांबली असली तरी याच उद्योगात काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांनी देखील सर्व समावेशक न्याय मागणे हे चुकीचे नाही.
मागील ५-६ महिन्या पासून अनेकदा आंदोलने, पाठपुरावा व असंख्य पत्रव्यवहारा नंतर देखील कामगारांच्या या ज्वलंत समस्यांकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उर्जामंत्री सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याची भावना सध्या वीज उद्योगातील कामगारांची झाली आहे.
कोरोना सारख्या महामारी काळासह वर्षानुवर्षे स्वतःचा जीव धोक्यात घालत,ऊन, वादळ,वारा, पावसात या कामगारांनी जीवाची तमा न बाळगता जनतेला अखंडित व सुरळीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत करणाऱ्या कामगारांना न्याय मिळावा, भरती मध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकशा नुसार वयोमर्यादेत वाढ करावी, विद्युत सहाय्यक ही भरती SSC च्या मार्क मेरिट नुसार न लावता ITI वीजतंत्री व तारतंत्रीच्या मेरिट नुसार करावी. कोरोना काळात शहीद झालेल्या २६ कामगारांना आर्थिक मदत करावी, आज रोजी कार्यरत अनुभवी एकाही कंत्राटी कामगाराचा रोजगार जाणार नाही याची ना.ऊर्जामंत्री व प्रशासनाने लिखित खात्री द्यावी.
या व अन्य प्रलंबित प्रमुख मागण्या साठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मुंबई येथे १४ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन होणार आहे.
तरी आपल्या न्याय हक्काचे लढाई साठी ,राज्यातील वीज कंत्राटी कामगारांनी सज्ज राहण्याचे आवाहन संघटनेनेच्या वतीने मा.बाबा दौलतराव पारखी, उपाध्यक्ष, चंद्रपूर, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ(संलग्न भारतीय मजदूर संघ) यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!