बौध्दमय समाज निर्माण करण्यासाठी पुढे यावे
कोरेगांव येथे महापरिनिर्वाण दिनी विजय बन्सोड यांचे प्रतिपादन
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
(देसाईगंज):- संपूर्ण भारत मी बौध्दमय करेन, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपूर्ण राहिलेले अपूर्ण कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी म्हणजेच संपूर्ण समाज बौध्दमय करण्यासाठी समाजातील जागरुक ,सुशिक्षित व आर्थिक संपन्नता असलेल्या व्यक्तींनी पुढे यावे ,असे प्रतिपादन दि बुध्दिस्ट सोसायटी अॉफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय बन्सोड यांनी केले आहे.ते तालुक्यातील कोरेगांव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना बोलत होते. सम्यक बौध्द समाज कोरेगांव चे वतीने आयोजित या कार्यक्रमात सर्वप्रथम 24 तरुणांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले. मागील चार वर्षांपासून सम्यक बौध्द समाज मंडळ, ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच प्रशांत किलनाके व उपसरपंच अनिल म्हस्के यांचे नेतृत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन महापरिनिर्वाण दिनी करीत असते.सायंकाळी प्रबोधन घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय बन्सोड तर प्रमुख अतिथी म्हणून दि बुध्दिस्ट सोसायटीचे जिल्हाध्यक्ष अभियंता नरेश मेश्राम, त्रिरत्न समता संघाचे अध्यक्ष चंदुराव राऊत, सचिव एम.ए.रामटेके, संघटक राजविलास गायकवाड , उपसरपंच अनिल म्हस्के, से.नि. प्राचार्य दहिवले, से.नि.केंद्रप्रमुख संदेश कराडे, माजी जि.प.सदस्या पल्लवी लाडे,सम्यक बौध्द समाजाचे अध्यक्ष भैयालाल मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य धनंजय तिरपुडे, संज्ञा मेश्राम , मणिषा लाडे ,समता सैनिक दलाचे प्रल्हाद लाडे, गुरुदेव अवसरे, चुडिराम राजगिरे, देवचंद वैद्य ,प्रभुजी डोंगरवार, नाजुक रामटेके यांनी विचार मंचावर स्थान भुषविले.याप्रसंगी चंदुराव राऊत, धनंजय तिरपुडे, पल्लवी लाडे,संदेश कराडे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचलन सोनाली मेश्राम ,प्रास्ताविक सचिन वैद्य तर आभार गितेश दहिवले यांनी मानले. यशस्वितेसाठी मंडळातील सदस्य खेमानंद मेश्राम, ताराचंद वैद्य, विकास मेश्राम, गौरव रामटेके, जगदिश मेश्राम, राहूल वासनिक, विवेक मेश्राम, रोशन रामटेके, नैतिक मेश्राम, सुनिल ऊके, अमित रामटेके व रेकचंद सहारे यांनी परिश्रम घेतले.




