असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ही एम्प्लॉईज’ ग्रुप गडचिरोली च्या वतीने रक्तदान शिबीर तसेच गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वितरण
-एकूण ८८ रक्तदात्यांनी रक्तदान करून माणुसकी दाखवली,
-तर तर १२विध्यार्थ्यांना ६००० रु.प्रमाणे शिष्यवृती चे धनादेश वितरितन..
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:- आज दि. २९नोव्हेंबर रोजी ‘असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ही एम्प्लॉईज’ ग्रुप गडचिरोली च्या वतीने वनविश्रामगृह गडचिरोली येथे रक्तदान शिबीर तसेच गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वितरण कार्यक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रमाला ग्रुप चे संस्थापक डॉ.किशोर मानकर वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, नागपूर, विभागीय वन अधिकारी गोखले सर, सामाजिक वनीकरण गडचिरोली तसेच किशोरभाऊ सोनटक्के केंद्रीय वनमजुर,वन कर्मचारी संघटनेचे कार्यध्यक्ष व गडचिरोली ग्रुप चे मार्गदर्शक सोनल भडके सर व ग्रुप चे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. शासकीय रुग्णालयात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन एक सामाजिक बांधीलकी म्हणून फिजीकल डिस्टन्स चे पालन करून रक्तदात्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे ८८ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली प्रत्येक रक्तदात्यांना प्रोत्साहनपर एक T-Shirt भेटवस्तू म्हणून देण्यात आले, तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृती वितरण समारंभात एकूण १२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये ६००० प्रमाणे शिष्यवृती चे धनादेश वितरितन करण्यात आले या प्रसंगी वनविभागतील संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थितीत होते..
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343



