“द ग्रेट पिपल्स ग्रुप ऑफ यवतमाळ” (एक हात माणुसकीचा) तर्फे संविधान दिन व सत्कार समारोह
वणी दि 29( नोव्हें):- प्रत्येक भारतीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाचा सन्मान समारोह दिनाचे आयोजन द ग्रेट पिपल्स ग्रुप ऑफ यवतमाळ (एक हात माणुसकीचा) यांच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२० ला संविधान दिनी करण्यात आले.
सदर कार्यक्रमास उदघाटक म्हणुन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.प्रा.डॉ. करमसिंग राजपुत सर तर विशेष अतिथी मा. विनोद गोन्लावार सर (आर्मी एअर डिफेन्स तथा शांती सैनिक), मा.एड. रेखाताई तेलंग (सामाजिक कार्यकर्त्या), मा.डॉ.अतिफ सय्यद (सामाजिक कार्यकर्ते) प्रामुख्याने उपस्थित होते
मान्यवारांच्या हस्ते दिप प्रज्वलित व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आलेत. सर्व अतिथींचे स्वागत ग्रुप चे संघटक इंजि. दिनेश रायपुरे व इतर सदस्य यांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आलेत.
उदघाटनीय भाषणात मा.आमदार साहेब बोलताना म्हणाले की, भारतीय संविधान हे जगातील लोकशाही पुन्नरजीवन करणारे आहे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व देशांच्या राज्य घटनांचा अभ्यास करून भारतीय विविध जाती-धर्म व बहु भाषिक राज्यांना एकसंघ केलेत. भारतीय प्रत्येक नागरिकांना समान नागरिक कायदा व सामाजिक, न्याय, स्वतंत्र्यता, समानता, बंधुता आधारित अशी राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ आहे. याचा आपण भारतीय होण्याचा सर्वाना अभिमान आहे. त्यानंतर प्रमुख संविधान विषयी विचार व्यक्त केलेत. आशिष मेश्राम यांनी संविधान कलम १४ चे महत्व विषद केले.
या संविधान दिनाच्या अनुषंगाने सामाजिक, शैक्षणिक व कला अशा विविध क्षेत्रात कार्य करणारे व्यक्तींचा सन्मान समारोह घेण्यात आला. सर्वप्रथम शहीद विकास कुळमेथे यांच्या आई व मारेगाव पोलीस स्टेशन येथील शहीद राजेंद्र कुळमेथे यांच्या पत्नीचा पुष्पगुच्छ, शाल व संविधान प्रत देऊन प्रमुख अतिथीच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्यानंतर वैभव ठाकरे , राहुल वरारकर (पी.एस.आय), जगदीश भगत, आशिष मेश्राम, गंभीर कवाडे, उमेश रासेकर, तेजस खैरे, अमोल धानोरकर, प्रिती दरेकर , करिष्मा नवले, सिमा कुमरे, काजल वाळके, अस्मिता वाळके, मुस्कान सय्यद, शंकरराव पुनवटकर, उदयपाल महाराज, रफिक रंगरेज यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कोविड-19 मध्ये डॉ.अमित शेंडे सर व त्यांची टीम तसेच सुरेश आसमवार, मेघा बांडे, योगिता कुणघाटकर तसेच कोरोना योद्धा म्हणुन भालेश्वर ताराचंद व त्यांची टीम यांचा सन्मान करण्यात आला.
.
कार्यक्रमाचे संचालन प्रदीप बोरकुटे , प्रास्ताविक राजु पिंपळकर तर कु.सिमा कुमरे हीने सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता मुख्य संयोजक इंजि. दिनेश रायपुरे व टीम चे इतर सदस्य यांनी परिश्रम घेतले.
*ठळक वैशिष्ट्ये:* सर्वप्रथम संविधान उद्देशीकाचे सामुहिक वाचन घेण्यात आले.
२६/११ मुंबई येथील शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली.



