डॉ.गणेश नैताम : शेतकरी ते डॉक्टर… एका आदिवासी डॉक्टरचा थक्क करणारा प्रवास………..
डॉ.गणेश नैताम यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्ति विशेष लेख..
वणी ( 29 नोव्हे ):- जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसात माणूस बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले शाहु आंबेडकरी तसेच बिरसा मुंडाच्या विचारांची कास धरून आज सामाजिक आणि वैद्यकीय व्यवसायात यशस्वी वाटचाल करणारी व्यक्ती म्हणजे डॉ गणेश नैताम ( कमल क्लिनिक) . तसं त्यांचं प्रोफेशनल वर्क डॉक्टर मध्ये आहे. पण त्यांची विशेष ओळख म्हणजे डॉक्टर यापलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आहे.
कायम ऍक्टिव्ह राहणं, प्रामाणिकता, समाजाशी असलेली त्यांची बांधीलकी बघता विविध सामाजिक संघटनेचे पद त्यांच्याकडे आपसुकच चालून येतात. हा सर्व डोलारा सुरळीत सुरू असताना त्यांनी अलिकडेच सुरू केलेली एक वैद्यकीय (डॉक्टरकी ) म्हणूनही वाटचाल यशस्वी ठरली आहे. आज बारा बलुतेदार यांच्या न्याय व हक्कासाठी ते लढा देत आहे. ते सध्या विदर्भ 24 न्यूज़ चे तालुका प्रतिनिधि म्हणून काम करीत आहे. अशा या होतकरू, प्रामाणिक, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे, पाय जमिनीवर ठेवत केवळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जगणा-या व इतरांनाही प्रेरणा देणारे युवा व्यक्तीमत्वडॉ.गणेश नैताम यांचा आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त वाचकांसाठी खास व्यक्तीचित्र…….
…
🎂🎊
जीव भावाचा डॉक्टर डॉक्टर गणेश नेता आदिवासी बहुसंख्य असलेल्या केळापूर तालुक्यातील येथे जन्मलेले डॉक्टर नैताम. अभ्यासाची आवड असलेले गणेश नैताम लहानपणी बालवयातच आई-वडील शेतातील कामे करायला सांगतात म्हणून इतर मुलांप्रमाणे खोटे न बोलता आई-वडिलांना बोलून घर सोडून संत गाडगेबाबा आश्रम शाळा उमरी येथे शिक्षण घेण्यासाठी गेले.उत्तीर्ण झाल्यानंतर पांढरकवडा येथील झेड .पी ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी सायन्स करून डॉक्टर बनण्यासाठी शेवटी बीएचएमएस करुन सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून नाशिक येथील कॉलेजमध्ये BHMS पूर्ण झाल्यानंतर ठाणे , कल्याण भिवंडी येथील नामांकित हॉस्पिटल मध्ये सेवा देत असताना, आपल्या कर्मभूमीत जन्मभूमीचे ओढ असताना गावात परतला .आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा तसेच समाजसेवेचे कार्य करत राहायचे याच उद्देश्यानी कर्मभूमित , जन्मभूमि गावात परतला.
मात्र डॉक्टर गणेश नैताम कोरोनाचा काळात आपल्या अखंड आरोग्यसेवा गरीब आदिवासी सह स्वतः चोवीस तास उपलब्ध करून लाइफ केअर या दवाखान्यात पांढरकवडा त्यानी अहोरात्र सेवा केली .अशाच समाज प्रेमी। डॉक्टर गणेश नेताम यांना त्यांच्या शाळेतील सर्वच मित्र मंडळ व समस्त वाघोली गावकरी तसेच पांढरकवडा शहरातील शुभचित्त वाढदिवस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
“💐💐 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊”💐💐💐



