पांढरकवडा येथे क्रांतिवीर शामा दादा कोलाम यांच्या 121 व्या जयंती व संविधान दिनानिमित्य भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले
पांढरकवडा (26 नोव्हे ) :- तालुक्यामध्ये प्रथमच श्यामा दादा जयंती निमित्त क्रांतिवीर शामा दादा कोलाम संघटना पांढरकवडा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती हेलोंढे( ए.पी.आय )पांढरकवडा ,कार्यक्रमाचे अध्यक्ष लेतुजी जुनघरे (माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती पंचायत समिती) राळेगाव,प्रमुख पाहुणे रामदास टेकाम ( मुख्याध्यापक) वामन ढोबळे, डॉ प्रवीण कंनाके, डॉ गणेश नैताम , श्रीकांत कुडमेथे, गंगाधर आत्राम (क्षेत्र समन्वयक ) तुकाराम आत्राम, गजानन मेश्राम, गणेश आत्राम.
सर्वप्रथमतः डॉ.आंबेडकर ,वीर बापूराव शेडमाके क्रांतिवीर बिरसा मुंडा ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज व क्रांतिवीर शामा दादा कोलाम यांच्या प्रतिमेला पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले .
कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .रक्तदानाच्या कार्यक्रमाला एकूण 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये आकाश आत्राम, जनार्दन किनाके, सुनिल केराम विष्णू सुरपाम संदीप टेकाम, डॉ गौरकर, गजानन आत्राम ,काशिनाथ टेकाम धीरज मंगाम ,मंगेश आत्राम, वैभव टेकाम, सुनील आडे अविनाश आत्राम, टेकाम संतोष, दडांजे रामकिसन टेकाम, अंकुश आत्राम ,निलेश सुरपाम ,प्रफुल जिड्डेवार, प्रफुल गेडाम ,अमित कुलकर्णी यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले .
या कार्यक्रमासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी आत्राम यांची सर्व टीम या कार्यक्रमाला मदत केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्याचे अध्यक्ष सुनील टेकाम, (उपाध्यक्ष) मारुती आत्राम (सचिव) श्रीकांत सुरपाम तसेच संघटनेचे मार्गदर्शक दिनकर कोंडेकर ,मुन्ना सुरपाम, संजय टेकाम सर जयवंत टेकाम सर, दादाराव आत्राम ,गुणवंत मडावी रमेश आत्राम ,मोहन आत्राम संजय आत्राम ,रामराव मडावी, रामचंद्र मांनगी, चिंतामण टेकाम, शाहू मोरे, प्रवीण मेश्राम, सुधाकर आत्राम संजय आत्राम, विजय शिंदे, गजू भाऊ मेश्राम, सुरपाम साहेब,मेश्राम साहेब सर्व मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमाचे संचालन गंगाधर आत्राम यांनी केले व आभार् सुरेश यांनी केले. शेवटी वैद्यकीय अधिकारी यांनी संघटनेला प्रमाणपत्र देऊन सर्व पदाधिकाऱ्यांचे व रक्तदात्यांची अभिनंदन केले .
कार्यक्रमाची सांगता झाली. पांढरकवडा तालुक्यातील सर्वच कोलाम पोडा मध्ये शामा दादाची ची जयंती करण्यात आली.कार्यक्रमाला सर्व समाज बांधव उपस्थित होते.
.



