Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रव्यापी संपाला पाठिंबा देत वणी येथे माकप व किसान सभेच्या रास्ता रोको (डेरा डालो, घेरा डालो “) आंदोलन

● शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करा व ईतर शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आंदोलन

वणी : २६ नोव्हेंबर संविधान दिन व कामगारांच्या राष्ट्रव्यापी संप तसेच शेतकऱ्यांच्या राष्ट्रव्यापी ” डेरा डालो, घेरा डालो ” ह्या आंदोलनंतर्गत वणी येथील तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्या समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांना घेऊन कॉ शंकरराव दानव, कॉ कुमार मोहरमपुरी व कॉ दिलीप परचाके यांचे नेतृत्वात भव्य निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने एका मागे एक भांडवलदारी, उदारीकरण व जागतिकीकरणाची धोरणे घेत देशातील सामान्य जनतेच्या अधिकारावर गदा आणीत त्यांना गुलामीत टाकणारे कायदे तयार करून राबविणे सुरू केले आहे. प्रचंड आंदोलनातून तयार झालेले कामगार कायद्यांमध्ये बदल करीत कामगारांचे अधिकार कमी केले, तर दुसरीकडे कृषी कायदा करून शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या घशात घालून त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे, त्याच प्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण आणून त्यामध्ये गरिबांपासून, दलित ,आदिवासी बहुजनापासून शिक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. ह्या मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी देशव्यापी संपात भाग घेत माकप व किसान सभेने वणी येथे तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको केला.

या आंदोलनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत करावी, पीकविमा योजनेची रास्त अमलबजावणी करून शेतकरयांना फायदेशीर पीक योजना तयार करावी, शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना आधारभावाने कायदेशीर संरक्षण द्यावे, कर्जमुक्ती योजना राबवावी, शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, नवीन वीज बिल मागे घ्यावा, वन जमीन, महसूल जमीन, तसेच देवस्थान इनामी जमीन कसत असणाऱ्यांचा नावे करावी, आदिवासींचे पेंडिंग असलेले दावे निकालात काढावे, ईतर पारंपरिक वनजमीन कसणाऱ्यांना या कायद्यातील तीन पिढ्यांची असलेली अट रद्द करावी, कोरोना लॉकडाउन काळातील जनतेचे व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे ह्या मागण्या रेटण्यात येऊन तहसीलदार यांचे मार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, नंदू बोबडे, विपलाव तेलतुंबडे रामभाऊ जिड्डेवार, सुधाकर सोनटक्के, कवडू चांदेकर, किसनराव मोहूर्ले, वंदना गेडाम तसेच आशा कर्मचारी संघटनेच्या प्रीती करमनकर त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ज्योती येरेकर यांचे नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही सक्रिय सहभाग घेतला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!