महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून वीज बिलाची केली होळी
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून वीज बिलाची केली होळी
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली :- महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात म.वि.आ. सरकारने वाढीव वीजबिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले असल्यामुळे आज रोजी वीज बिलांची होळी करून प्रखर आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, जि.प. समाज कल्याण सभापती रंजिता कोडाप, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर , शहर महामंत्री विनोद देवोजवर उपस्थित होते. यावेळी राज्य सरकार च्या विरोधात गांधी चौक येथे घोषणा देऊन राज्य शासनाच्या जाहीर निषेध करण्यात आला.



