आदिवासी युवक विदयार्थाचे शिष्टमंडळ यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांच्या मार्फ़त मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांना साकड़े
पांढरकवडा :- आदिवासी समाजातील उच्च विद्याविभूषित युवक विदयार्थी ( UPSC ) भारतीय प्रशासकीय सेवेत समावेशित होण्याची इच्छा बाळगून अहोरात्र अभ्यास करीत आहेत व आदिवासी विद्यार्थ्यांचा आर्थिक परिस्तिथी अत्यंत बिकट असून UPSC परीक्षा पास होण्यासाठी दिल्ली येथे दर्जेदार खासगी निवासी पूर्व प्रशिक्षण वर्गाची अत्यंत आवश्यकता आहे.
पुणे येथे असलेल्या TRTI ( TribalResearch & Trainind Institude ) बार्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटूदे,सारथी छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग आनंद हुमान डेव्हलपमेंट, यशदा यशवंतराव चव्हाण अकॅडमि ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन या शासनाच्या स्वायत्त संस्था असूनही अजुनपरीयंत आदिवासी विध्यार्थांना IAS, IPS, ITS, IFS, IES, बनविण्यास असमर्थ ठरत आहे व या बाबीसाठी शाशन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. इतर समाजाप्रमाणे आदिवासी विधार्थ्यांची गुणवत्ता योग्य असून त्यांना फक्त योग्य संधी ,सुविधा ,प्रशिक्षण इतर आर्थिक बाबींची आवश्यकता आहे. ज्या प्रमाणे TRTI, Barti, Sarathi, Yashada Pune या संस्थांनी फक्त SC चे विविध्यर्थी १०० व जवडपास मराठी विध्यार्थी १०० या समाजातील होतकरू विध्यार्थ्यांना दिल्ली येथे निवासी खासगी संस्थेत प्रशिक्षण व इतर आर्थिक सोईसुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत .त्याच प्रमाणे अनु जमाती ( ST ) प्रवर्गातील गुणवत्तापूर्ण विधार्थांवर आदिवासी विकास विभागाने उपक्रम राबवावा व मोठ्या प्रमाणात ( ST) प्रवर्गातील विध्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी व आदिवासीं विकास मंत्रालयाने या बाबींवर लक्षपूर्वक विचार करून तात्काळ असा उपक्रम चालू करावा. या मागणीला घेऊन पांढरकवडा येथे नव्याने रुजू झालेल्या विवेक जोसन्स IAS एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांच्या मार्फत आदिवासी युवक विधार्थ्यांचे शिष्टमंडळ यांनी मुखमंत्री व आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदन सादर केले,यज्ञवेदी प्रशांत सोयाम, ऍड. मकरंद आत्राम, भारत मडावी, डॉ.गणेश नैताम, स्वप्नील परचाके, प्रवीण जुमनाके, धीराज सोयाम, छत्रपती मडावी, भीमराव आत्राम .ज्ञानेश्वर आत्राम आदी उपस्थित होते.



