Vidarbh24News

Latest Online Breaking News

भाजपाचा पदाधिकारी राम लखिया विरोधात उलगुलान संघटनेची तक्रार

-सोशल मीडियावर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
मुल:- भाजपाचा पदाधिकारी राम लखिया यांनी व्हाट्सअप च्या श्रीकृष्ण ग्रुप वर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातीय द्वेष भावनेतून टीकाटिप्पणी केली. सदर पोस्ट मुळे जातीजातीमध्ये वादविवाद लावणे व जातीय दंगल घडवून आणण्याचा प्रकार करणे असे आढळून आले. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या संपूर्ण समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावलेल्या असून जातीय द्वेष भावनेतून पोस्ट करणारा राम लखिया याच्यावर जाती-जातीत वादविवाद घालने, जातीय दंगल घडवून आणणे या गुन्ह्यात अंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी तक्रार उलगुलान संघटनेच्या वतीने मुल पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली. संबंधित राम लखिया याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली नाही तर उलगुलान संघटना कायदा हातात घेणार व आपल्या स्टाईलने अपमान करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवणार असा इशारा मुल येथील उलगुलान संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.पोलीस निरीक्षक मूल यांना निवेदनासोबत तक्रार देताना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, साहिल खोब्रागडे, प्रणय रायपुरे, शुभम दहिवले तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!