राजुर ईजारा अनेक समस्यांच्या विळख्यात राजुर ग्रामपंचायतीचा दुर्लक्षितपणा आणून दिला लक्षात – मनसे विभाग प्रमुखाने दिले निवेदन.
वणी – तालुक्यातील राजुर हे गाव ईजारा अनेक समस्यांच्या विळख्यात आहे .इजारा गावकरी यांनी राजुर ग्रामपंचायतीचा दुर्लक्षितपणाआज निवेदनातून सामोरआणून दिला लक्षात आला आहे.राजुर ईजारा येथील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून डेंग्यू ,टायफाईड , मलेरिया यासारखे आजाराने रुग्ण गावात मोठ्या प्रमाणात आढळत आहे. आज ग्रामपंचायतीवर एवढी मोठी बिकट परिस्थितिची समस्या आलेली आहे की , प्रत्येक गावकर्याला ग्रामपंचायत मध्ये जाऊन प्रत्येक समस्यांची सोडवणूक करण्यात करावी लागत आहे किंवा निवेदन द्यावे लागत आहे. याचा अर्थ असा की,सध्या सर्व ग्रामपंचायत येथील अधिकारी सुस्त अवस्थेत किंवा निद्रावस्थेत आहे की ?अथवा नागरिकचा आरोग्याशी खेळ करत असेल तर ,राजुर ग्रामपंचायतच्या सुस्त अधिकारी यांना जागे करावे लागणार की क़ाय ? आज असा सवाल सर्वासमोर उपस्थित झाला आहे. पुढील काळात नवरात्र येत असून या समस्या वाढतच चाललेले आहे. जर या समस्या संपुष्टात आले नाही तर ,मनसे विभाग प्रमुख श्री प्रदीप बांदूरकर व सर्वगावकरी यांनी ग्रामपंचायतीला समोरच्या भूमिकेवर आम्ही जबाबदार राहणार नाही असे स्पष्ट संकेत त्यांचा निवेदनातून दिले आहे.तसेच
जर येत्या आठ दिवसात वरील समस्या न सोडविल्यास मनसे विभाग प्रमुख प्रदीप बांदूरकर व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत समोर सर्व कचरा आणून टाकेल ! असा इशारा मनसे विभाग प्रमुखांनी ग्रामपंचायतीला सांगितले आहेत.
आता तरी राजुर ग्रामपंचायतेचे अधिकारी जागे होणार की नाही ? की नागरिककडे पुन्हा एकदा पाठ दाखविनार की क़ाय ? येत्या आठ दिवसात दिसेल ?



