Vidarbh24News

Latest Online Breaking News

पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार 12 व 13 ऑक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. 12 ऑक्टोंबरला सकाळी 9 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ नागपूर वरून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व विभागांच्या विकासकामांबाबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 1:30 वाजता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक असणार आहे. दुपारी 2.30 ते 3.30 त्यांचा वेळ राखीव असणार आहे. सायंकाळी 4 वाजता ब्रह्मपुरी वरून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व रानफुल निवास गडचिरोली येथे मुक्काम असणार आहे.

13 ऑक्टोंबरला सकाळी 10 वाजता गडचिरोली येथुन चंद्रपूर कडे प्रस्थान करतील. सकाळी 11:30 वाजता चंद्रपूर येथे आगमन व कोविड-19 बाबत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहे. दुपारी 2.30 ते 4.30 वाजता त्यांचा वेळ राखीव असणार आहे. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रस्थान करतील.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!