अखेर त्या ईश्वर शुक्ला ह्याचा मृतदेह हा गोंडपिंपरी तालुक्यातील सकलुर गावाच्या नदी पात्रात सापडला..
वणी – दोन आठवड्यापूर्वी उकणी येथील तरुणाने, पाटाळ्या जवळच्या वर्धा नदीवरच्या पुलावरुन उडी घेतली होती. परंतु त्याचा कुठलाही पत्ता लागला नाही. अखेर त्याचा मृतदेह हा गोंडपिंपरी तालुक्यातील सकलुर गावाच्या नदी पात्रात आढळून आला.
ईश्वरने घातलेल्या कपड्यावरुन त्याची ओळख करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
17 सप्टेंबर गुरुवारला ईश्वर शिवशंकर शुक्ला(23) या इसमाची दुचाकी क्र.(MH29 BV 9419) व मोबाईल पाटाळा नदीच्या पुलावर आढळून आला होता .त्यामुळे त्यांनी नदी पात्रात उडी घेतली असावी असा संशय वर्तवला जात होता. त्यामुळे शोध पथक ईश्वरचा शोधात होती . परंतु आठवडा लोटून सुध्दा कुठलाही थांगपत्ता न लागल्याने, शोध मोहीम बंद करण्यात आली. परंतु काल संध्याकाळी त्याचा मृतदेह चंद्रपुर जिल्ह्यातील, गोंडपिंपरी तालुक्यातील सकलुर या गावच्या नदीपात्रात अत्यंत कुजलेल्या अवस्थेत, असल्याने त्याची ओळख कपड्यावरु झाल्याचे समजते. याबाबत ईश्वरच्या घरच्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले.



