दिड वर्षाची प्रतीक्षा लवकरच संपणार, DG लोनसाठी कागदपत्रे दाखल केलेले ३००० पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना लवकरच मिळणार लोन
-गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर जनता दरबारात पोलीस बॉईज असोसिएशनला दिले आश्वासन
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांची माहिती
विदर्भ 24 न्युज
नागपूर:- 26 सप्टेंबर रोजी पोलीस जिमखाना नागपूर येथे पार पडलेल्या जनता दरबारामध्ये पोलीस बॉईज असोसिएशनचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॅनियल जोसेफ अँथोनी यांनी दीड वर्षांपासून रखडलेले DG लोन कधी मिळणार असा प्रश्न गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांना विचारला असता, त्यांनी सांगितले की DG लोन संदर्भातील फाईल माझ्या टेबलावर आली असून लवकरात लवकर याची प्रक्रिया पूर्ण करून पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले.त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी दिलेल्या या अश्वासनामुळे दीड वर्षांपासून DG लोनसाठी प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३००० पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना न्याय मिळणार असल्याचे दिसत आहे. गृहमंत्री साहेबांच्या या आश्वासनाचा सन्मान करत पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी संपूर्ण पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे त्यांचे आभार मानले.
महराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यास व होमगार्ड सैनिकांना काही समश्या असल्यास
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन
महाराष्ट्र राज्य यांनी खालील फोन नंबर ला संपर्क साधण्यास आव्हान केले आहे 9604972682, 8669838008




