जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली : जिल्ह्यात कोरोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून पोलिसांना व वनविभाग कर्मचाऱ्यांना विनंती
विनंती
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली : जिल्ह्यात कोरोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून पोलिसांना व वनविभाग कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली पासून जवळ असलेल्या तीन किलोमीटर अंतरावर पातानिल फाट्यावर यासंदर्भातील पत्रके आढळली आहे. या पत्रकांच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांना जंगलातील गस्त बंद करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा दलातील सैनिक आदिवासी गावांमध्ये कोरोना आणत असल्याचा दावा नक्षल्यांनी केला आहे. बाहेरून येणारे सैनिक गस्त घालताना आदिवासी गावांमध्ये कोरोना पसरवत आहेत. गावांमध्ये कुठलीही सुविधा व उपचार नसल्याचा या पत्रकात उल्लेख आहे. राज्य शासन नवे दवाखाने आणि शाळा उघडण्याऐवजी पोलीस भरती करून आदिवासी जनतेची फसवणूक करत असल्याचा उल्लेख या पत्रकातून करण्यात आलाय.



