राजुर येथील जनता सार्वजनिक ठिकाणी मास्कविना,पोलिस व गावातील प्रशासनाचे (दुर्लक्ष) फिरते पाठ
राजुर गावात हलगार्जिपना ……… प्रशासनाने लक्ष देण्याची गरज….
वणी -तालुक्यातील राजुर येथे कोरोनाचे वाढते रुग्ण असताना सुद्धा गावातील जनता ही सार्वजनिक ठिकाणी मास्कविना फिरत आहे.तसेच गावात खुप मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे. परिणामी आतापर्यंत गावात 3 रुग्ण दगावले असताना सुद्धा पोलिस व गावातील प्रशासन पाठ दाखविल्याचे चित्र दिसून येत आहे. गावातील जनता जनार्दन सार्वजनिक ठिकाणी मास्कविना खुप मोकाट फिरत आहे.
महत्वाचे कारण राजुर येथील पोलिस प्रशासन व गावातील प्रशासनाचे दुर्लशितपणा ! . गावात एका पाठोपाठ एक मृत्युमुळे गावात भीतीचे वातावरण दिसत आहे. यासाठी गावातील प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नाही आहे.ऊलट याकडे पूर्णपणे गावातील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. करिता गावातील जनतेने आणि पुढारि एकत्रित येऊन गावाच्या या समस्यावर तोडगा काढण्यास प्रशासनाला भाग पाडायला पाहिजेत..कोणाची वाट बघत आहे राजुर येथील प्रशासन ? मास्कविना गावातील जनता सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरत आहे ह्यांना शासनाच्या नियमाची भीति नाही का ?
श्री मा. जिल्ह्याधिकारी यवतमाळ यांनी सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा आढळल्यास मास्कविना फिरणाऱ्यावर 500 रु.दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करणे व तिसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करणे असा आदेश काढला असला तरीही राजुर येथील आता पर्यंत पोलिस प्रशासन व गावातील प्रशासन जागे झाले नाही. याउलट या नियमाची उचलबांगड़ी करतांना दिसून येत आहे. गावात कोरोनाचा अधिक संक्रमण होत आहे व मास्कविना ह्या मागील जबाबदार कोण ? असा प्रश्न गावकरीच करत आहे.राजुरसाठी प्रशासन लवकरात लवकर क़ाय पाऊल ऊचलेल ? ह्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .



