Vidarbh24News

Latest Online Breaking News

वर्धा नदीवर शिवणी-मार्डा परीसरात बंधारा बांधण्याची मागणी- चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष श्री. उमाकांत भाऊ धांडे यांनी शासन व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा शहर तालुका प्रतिनिधी ८८५५९९४९०१

वर्धा नदीवर शिवणी-मार्डा परीसरात बंधारा बांधण्याची मागणी- चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष श्री.उमाकांत भाऊ धांडे यांनी शासन व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजुरा, कोरपना व चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीचा ठरणारा

वर्धा नदीवर शिवणी-मार्डा परीसरात बंधारा बांधण्याची मागणी

सास्ती- वर्धा नदी पट्टयात कोणताही सिंचन प्रकल्प नसल्यामुळे राजुरा, कोरपना व चंद्रपूर तालुक्यातील शेतकरी‌ सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे हा भाग अत्यंत मागास राहिलेला आहे. या परीसरात वेकोलीच्या
खाणींमुळे भुगर्भातील पाण्याची पातळी आधीच खोलवर गेलेली
आहे. यामुळे वर्धा नदीवर शिवनी (चोर) -मार्डी परीसरात बंधारा मंजुरीसाठी शिवणी, धिडशी, पेल्लोरा, साखरी आणि चार्ली ग्राम पंचायतीने बंधारा मंजुर करण्यासाठी ठराव घेतलेले असुन
परीसरातील गावांत नागरीकांनी स्वाक्षरी अभियान देखील राबविले आहे. या अनुषंगाने गेल्या काही वर्षांपासुन वर्धा नदीवर बंधा-यांचे मागणीला जोर आल्यामुळे पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागाकडुन मिळालेल्या माहिती नुसार चंद्रपुर तालुक्यातील धानोरा, बल्लारपुर तालुक्यातील आमडी आणि राजुरा तालुक्यातील धानोरा (सिंधी) येथे साखळी बरेजेस प्रस्तावित आहेत. हि आनंदाची बाब असली तरी शिवनी (चोर) ते मार्डी परीसरात बंधा-याचे मंजुरीसाठी पाटबंधारे विभाग आणि
लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदन देण्यात येऊनही लोक भावनेकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. शिवनी (चोर) -मार्डी परीसरात बॅरेज झाल्यास परीसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. चंद्रपुर, बल्लारपुर, राजुरा व कोरपना तालुक्यातील गावांना सिंचनाचा लाभ होण्यासोबतच धानोरा उपसा जलसिंचन योजना आणि परीसरातील उद्योगांकरीता पाणी उचल करणे शक्य होणार आहे. शिवाय भविष्यात चंद्रपुर शहराचे पिण्याचे पाण्याचा प्रश्न निकालात निघु शकतो.
राजुरा, कोरपना व चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीचा ठरणारा वर्धा नदीवर शिवणी-मार्डा परीसरात बंधारा बांधण्याची मागणी परीसरातील शेतकऱ्यांच्या वतीने ‌चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष उमाकांत धांडे यांनी शासन व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!