Vidarbh24News

Latest Online Breaking News

पूरग्रस्त भागाना सभापती कोरेवार यांची भेट

पूरग्रस्त भागाना सभापती कोरेवार यांची भेट 

कवठी प्रतिनिधी
गोसेखुर्द प्रकल्प येथील पाणी वैनगंगा नदीला सोडल्या मुळे वैनगंगा नदीला पूर येऊन नदीकाठारील आणि नाल्या ला लागून असलेल्या शेतजमिनीमध्ये पुराचे पाणी सतत तीन, चार दिवस शिरून राहिल्याने उभ्या डोलदार पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. कवठी ते हरणघाट, पारडी ते हरणघाट आणि मुल ते चामोर्शी मार्ग सतत तीन दिवस बंद असल्यामुळे या सर्व मार्गावरील वाहतुकीची येर – झारा ठप्प पडली होती. दरम्यान, पंचायत समिती सभापती मा. विजयजी कोरेवार यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली.
सावली तालुक्यातील कवठी, रुद्रापूर आणि पारडी ही गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहेत. आणि या नदीला लागूनच शेतकऱ्याच्या जमिनी आहेत.त्या जमिनीमध्ये धान, कापूस, सोयाबीन आदी पिकांची लागवड
केली होती. परंतु गोसेखुर्द प्रकल्पा च्या पाण्यामुळे नदीला पूर आला आणि नाले भरून आल्याने पिकात पाणी शिरून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहेत.शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले दिसून येत आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकरी संकटात सापडला आहे.शासन किती आणि कशी मदत करेल हे शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे.
पिकामध्ये पुराचे पाणी शीरल्यामुळे उभ्या असलेल्या आणि नासधूस झालेल्या पिकांची संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करावी आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी अशी मागणी कवठी, पारडी आणि रुद्रापूर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी या संपूर्ण भागाचा दौरा करून पूरग्रस्त शेतीची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत भरपाई मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जानार असल्याचे सभापती कोरेवार यांनी सांगितले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!