२६दरवाजे उघडल्याने गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली : गोसेखुर्द धरणातून तब्बल २३ हजार २४१ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे गोसेखुर्द धरणाचे २६ दरवाजे साडेतीन मीटरने , तर ७ दरवाजे ४ मीटरने उघडण्यात आले आहे . यामुळे नद्यांना पूर आला असून जिल्ह्यातील काही मार्ग बंद पडले आहेत. गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. गोसेखुर्दच्या पाण्यामुळे गाढवी व पाल नदीला पूर आल्याने गडचिरोली – आरमोरी मार्ग , शिवणी नाल्याच्या पुरामुळे गडचिरोली चामोर्शी , गाढवी नदीच्या पुरामुळे आरमोरी – रामाळा , तसेच रस्त्यावर पाणी आल्याने देसाईगंज – लाखांदूर हे मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.



