माहिती अधिकार व पत्रकार सरंक्षण समिति ,चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष पदी रूपचंद लाटेलवार यांची निवड
माहिती अधिकार व पत्रकार सरंक्षण समिति ,चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष पदी रूपचंद लाटेलवार यांची निवड
सावली येथील युवा व तडफ़दार नेतृत्व असलेले पत्रकार रूपचंद केशवराव लाटेलवार यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टी NSP (U) संलग्न माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांची चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिनांक 28 ऑगस्ट रोजी त्यांना याबाबत नियुक्तीपत्र देण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष अभिजीत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक कांबळे यांच्यासह, राष्ट्रीय महासचिव मा. गोविंद भावे, समस्त विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनात अहमदनगर येथे बैठक पार पडली. यात महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्य तसेच होते. या बैठकीत रूपचंद केशवराव लाटेलवार यांची चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्ती बद्दल रूपचंद केशवराव लाटेलवार यांचे परिसरात अभिनंदन केले जात आहे. नॅशनल सोशालिस्ट पार्टी NSP (U) संलग्न माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती ही समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार, पत्रकारांवर होणारे हल्ले, तसेच सामाजिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात काम करते.



