*सावली तालुक्यात शांत पणे पार पडला पोळ्याचा सन*
*सावली तालुक्यात शांत पणे पार पडला पोळ्याचा सन*
कवठी प्रतिनिधी
देशांतर्गत तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे तसेच महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखन्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती प्रतिबंधक अधिनियम 2005 पासून लागू केलेला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड – 19 या आजरावर नियंत्रण व प्रसार रोखन्याकरिता विविध उपाययोजना सुरु आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखन्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक, सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमास बंदी घालन्यात आलेली आहे.
त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पोळा व तान्हा पोळा या सनामध्ये पसरन्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे असे निर्देशनास येत आहे.
बैल पोळा हा सन श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलाचा सन आहे.बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करनारा हा एक मराठी सन असून संपूर्ण महाराष्ट्रा मोठया उत्साहाने साजरा केला जातो.
त्यामुळे सर्व शेतकरी बांधवाना प्रशासनामार्फत गावोगावी दवंडी देऊन कळविण्यात आले होते. पोळा व तान्हा पोळा सन साजरा करा. पण गर्दी करू नका. आणि त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी यावर्षी कुठल्याही प्रकारचा वाजागाजा, गर्दी, जल्लोष आणि मिरवणूका न काढता आपआपल्या घरीच बैलांची सजावटी आणि पूजा करण्यात आल्या. अगदी साध्या आणि शांत पद्धतीने पोळा हा सन पार पडला.आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्यात आले.



